बारे खुर्द(ता.भोर) येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर.
पुण्यभूमी महाराष्ट्र न्युज
मुख्य संपादक : मंगेश पवार
कार्यकारी संपादक : सागर खुडे
रोटरी क्लब ऑफ लोकमान्य नगर व रोटरी क्लब ऑफ भोर राजगड यांच्या संयुक्त विद्यमाने व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर बारे (खुर्द)संपन्न झाले. या शिबिराचे नियोजन आर. सी.सी .यशोगाथा ग्राम विकास बारे खुर्द ने केले.
यावेळी परिसरातील २५५ लोकांची मोफत नेत्र तपासणी करून १८०लोकांना चष्मे वाटप करण्यात आले.
त्यातील 20 पेशंटसाठी मोतीबिंदूचे ऑपरेशन एच.व्ही.देसाई रुग्णालयात नियोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्य नगर चे अध्यक्ष अविनाश तरवडे ,रोटे.अजय वाघ,रोटरी क्लब राजगडचे अध्यक्ष डॉ रूपाली म्हेत्रे, सचिव अभिजीत बांदल, डॉ. आनंदा कंक, डॉ,संजय म्हेत्रे, प्रा. श्रीकांत निकम ,प्रा.विनय कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब नवले ,स्मिता काळे,गोसावी सर ,केशव शेटे,सविता थोपटे सुनील थोपटे आदी रोटरी सदस्य, बारे गावचे उपसरपंच दीपक खुटवड ,सुरेश खुटवड ,निखिल भालेराव ,महेश खुटवड ,अक्षय चव्हाण, पंढरीनाथ बदक, महेश खुटवड, नीलम झांजले ,पुनम बदक, दामिनी खुटवड,दत्तात्रय खुटवड लक्ष्मण बदक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
सूत्रसंचालन सायली बांदल हिने केले आभार माउली बदक यांनी मानले यावेळी ग्रामस्थ आदींसह सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.


