भोर तालुक्यातील ७३ ग्रामपंचायती प्रशासकांच्या ताब्यात! निवडणुकांच्या प्रतीक्षेत गावकारभारी
मंगेश पवार
भोर तालुकामधील ७३ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात आल्याने, जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार संबंधित ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकनियुक्त सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे सध्या या सर्व ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहिला जाणार आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये कुसगाव, रांजे, कासुर्डी खेबा, वेळू, ससेवाडी, शिंदेवाडी, शिंद, महडे बुद्रुक, संगमनेर, मोरवाडी, किकवी, कापूरव्होळ, दिवळे, कामथडी, नसरापूर, केळवडे, मोहरी खु., मोहरी बु., हातवे बु., तांभाड, चिखलावडे, पान्हवळ, उत्तरौली, वडगाव डाळ, चिखलगाव, वेणवडी, धावडी, नाझरे, गवडी, पिसावरे, खानापूर, देगाव, नायगाव, केंजळ, धांगवडी, वर्वे बु., आळंदे, साळवडे, जांभळी, बाजारवाडी, सारोळे, बालवडी, आंबाडे, पाले, गुणंद टापरेवाडी, पांडे, राजापूर, न्हावी १५, न्हावी ३२२, नांद,
पोंम्बडी, कांजळे, खोपी, पेंजळवाडी, शिवरे, गोकवडी, भाबवडी, नेरे, नन्हे, माझगाव, जोगवडी, गोरड म्हसवली, आळंदेवाडी, हातवे खुर्द, निगडे, भोंगवली, सावरदरे म्हाळवडी, उंबरे.नेरे, नन्हे, माझगाव, जोगवडी, गोरड म्हसवली, आळंदेवाडी, हातवे खुर्द, निगडे, भोंगवली, सावरदरे, बदल बुद्रुक व म्हाळवडी तसेच उंबरे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
या सर्व गावांचा कारभार आता प्रशासकांच्या माध्यमातून चालवला जाणार असून, विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी, निधी वितरण तसेच दैनंदिन प्रशासकीय निर्णय प्रशासकीय प्रक्रियेतून घेतले जाणार आहेत.
दरम्यान, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका होण्याचे संकेत मिळत असून, त्यामुळे तालुक्यातील गावकारभाऱ्यांचे लक्ष शासन निर्णयांकडे लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक गावांत इच्छुक उमेदवारांकडून हालचालींना सुरुवात झाली असून, राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.


