सारोळे येथे रात्री बेवारस महिलेचा मृत्यू; १०८ सेवा, राजगड पोलीस व प्रशासन सक्रिय
भोर तालुक्यातील सारोळे गावात विठ्ठल–रखुमाई मंदिर परिसरात नन्नी गायकवाड (महिला) ही बेवारस अवस्थेत पडलेली आढळून आली. ही बाब लक्षात येताच ओंकार महांगरे, साईनाथ धाडवे व भास्कर धाडवे यांनी तातडीने १०८ आपत्कालीन सेवेला कॉल केला.
कॉलनंतर १०८ रुग्णवाहिकेचे आपत्कालीन डॉक्टर मंदार माळी आणि आरोग्यसेवक (cho) काकडे हे रात्री सुमारे ११ वाजता पायलट विशाल कदम यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासणीअंती सदर महिला मयत असल्याचे त्यांनी घोषित केले.
ADVERTISEMENT
यानंतर राजगड पोलीस स्टेशन येथील पोलीस साळुंके व इंगळे यांनी घटनास्थळी येऊन पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय भोर येथे हलविण्यात आला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बेवारस व्यक्तींच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.


