जि.प.प्राथ.शाळा-न्हावी शाळेत एअर प्रॉडक्ट्स कंपनी पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून सोलर वॉटर फिल्टर, लायब्ररी प्रकल्प उद्घाटन कार्यक्रम.
संपादक : मंगेश पवार
सारोळे : जि.प.प्राथ.शाळा-न्हावी शाळेत एअर प्रॉडक्ट्स कंपनी पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून व बेजिंग जि.प.प्राथ.शाळा-न्हावी शाळेत एअर प्रॉडक्ट्स कंपनी पुणे यांच्या आर्थिक सहकार्यातून व बीइंग व्हॉलंटियर फौंडेशन पुणे यांचे संयुक्त विद्यमाने सोलर वॉटर फिल्टर/लायब्ररी/बंकबेड प्रकल्प उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.ताशाच्या वाद्यावर लेझिम नृत्यावर आलेल्या पाहुण्यांचे स्वागत जि.प.शाळा न्हावी शाळेतील विध्यार्थ्यानी केले.यावेळी न्हावी शाळेत बसवलेल्या सोलर वॉटर फिल्टरचे प्रतिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
बीइंग व्हॉलंटियर फौंडेशन पुणे यांच्या वतीने देणेत आलेल्या २५ नारळ रोपांचे शाळा परिसर व शेताच्या बांधावर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पुणे व अहिल्याबाई होळकर नगर जिल्ह्यातील एकूण १५ शाळांना या सुविधा उपलब्ध करून देणेत आल्या.
यावेळी
यामध्ये सोलर वॉटर फिल्टर
१)न्यू इंग्लिश स्कूल न्हावी /जि प प्राथ शाळा न्हावी.ता.भोर
2)न्यू इंग्लिश स्कूल लोणीभापकर, ता. बारामती.
3)कर्मवीर भाऊराव पाटील आश्रमशाळा पिंपळदरी,अकोले.
४)यशस्वी प्राथ आणि माध्यमिक विद्यालय मोशी.
लायब्ररी ५)सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरनगर, बारामती.
६)रामचंद्र गायकवाड हायस्कूल दिघी.
७)संत तुकाराम माध्यमिक विद्यालय खराडी.
८)ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कूल चिखली.
९)मंजुरीबाई प्राथ. माध्यमिक विद्यालय दिघी.
१०)समता बालक मंदिर येरवडा.
११)श्री कोरेश्वर विद्यालय श्रीगोंदा.
१२)श्री शिवाजी वीर बाजी पासलकर विद्यालय पानशेत.
१३)शाहूराव कापरे पाटील माध्य. विद्यालय शेवगाव.
१४)आदर्श माध्य. आश्रमशाळा करोडी.
१५) बंकबेड जिजाई बालांगण हॉस्टेल पाथर्डी.या शाळांना साहित्य व प्रकल्प पाटी वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमप्रसंगी मिता चोजाल-इंडिया जनरल कौन्सिल, एअर प्रॉडक्ट कंपनी, मुरली पिल्लाई -हेड ऑफ कॉर्पोरेट कॅम्युनिकेशन, धनश्री पराडकर-हेड ऑफ एच आर इंडिया,अमित सुभेदार -हेड ऑफ कंट्री फायनान्स, कैलास नरवडे -संस्थापक अध्यक्ष बीइंग व्हॉलंटियर फौंडेशन पुणे,भानुदास आभाळे संस्थापक सदस्य,बीइंग व्हॉलंटियर फौंडेशन पुणे.आकाश कांटे,भूषण हलवालकर ,संदिप जगताप,स्मिता लाडे प्रमोद जगताप, दत्तात्रय कारळे,सचिन सोनवणे,शरद सोनवणे, अनिकेत भोसले,सुनिल येवले,संपत्ती कोळी,अनिता पोतेकर अविनाश भोसले,रुपाली पिसाळ,पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे व मोठया संख्येने शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास नरवडे यांनी केले,सूत्रसंचालन सौ.पूजा बिहाणी यांनी केले तर अनिल चाचर सर यांनी आभार मानले.


