33 वर्षांची शैक्षणिक सेवा पूर्ण – मुख्याध्यापकांचा गौरव सोहळा
मंगेश पवार
दि. 29 एप्रिल भोर :– शिक्षण क्षेत्रात तब्बल 33 वर्षे प्रामाणिकपणे सेवा बजावून मुख्याध्यापक पदावरून सेवापूर्ती करणाऱ्या शिक्षकांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
सन 1993 मध्ये माध्यमिक विद्यालय, आपटी येथे नोकरीची सुरुवात करून त्यांनी आपल्या कारकिर्दीचा प्रवास सुरू केला. त्यानंतर पसुरे बारे येथील राजा रघुनाथराव विद्यालय, भोर येथे 1996 ते 2005 आणि पुन्हा 2019 ते 2022 या कालावधीत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. तसेच सारोळे येथेही त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले.

शेवटी रायरी येथून बदली होऊन आपटी येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत राहून त्यांनी आपल्या सेवेला यशस्वी पूर्णविराम दिला.
या प्रसंगी त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सारोळे येथील मा. सरपंच संभाजी घारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय धाडवे, मा. अध्यक्ष योगेश धाडवे, सुनिल धाडवे तसेच बीड ट्रान्सपोर्टचे मालक दत्ता कोठूळे, नजीर पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


