कापूरहोळ चौकात गोळीबार.
कापूरहोळ ता. भोर जि.पुणे गावच्या हद्दीत कापुरहोळ चौकात दि. 04/06/2025 रोजी सायकांळी 05.00 वा. सुमा, मौजे कापुरहोळ ता. भोर जि. पुणे गावच्या हददीत कापुरहोळ चौकात आरोपी नामे अनुज दत्तात्रय झेंडे, वय 20 वर्ष, रा.दिवे ता. पुरंदर जि. पुणे. याने त्याच्या ताब्यातील बुलेट गाडी नं MH 12 QL 0094 हिच्या सायलेन्सर मधुन मोठ मोठ्याने आवाज काढून त्याच्याकडील पिस्टल मधुन हवेत फायरिंग करुन दहषत माजवुन अनुज दत्तात्रय झेंडे, वय 20 वर्ष, रा. दिवे ता. पुरंदर जि. पुणे.
कापूरहोळ चौकात गोळीबार केल्यानंतर आरोपी झेंडे हा मोटारसायकलवरून नारायणपूरच्या दिशेने निघाला. मात्र, तो त्या वेळी दारूच्या नशेत होता आणि वाहनावरचे नियंत्रण सुटल्यामुळे त्याचा अपघात झाला. अपघातात तो जखमी झाला असतानाच परिसरातील सजग नागरिक गणेश सुनिल लोहार आणि ऋतिक मारुती लोहार यांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतले आणि राजगड पोलीस स्टेशनमध्ये सुपूर्त केले.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत छगन इंगळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून एक सिल्व्हर रंगाची, लाकडी मुठ असलेली अंदाजे ₹5,000 किमतीची पिस्टल जप्त केली आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड पुढील तपास करीत आहेत.