कापूरव्होळ गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल केली लंपास.
सारोळे : पुणे सातारा महामार्गावरील भोर तालुक्यातील कापूरव्होळ गावच्या हद्दीतुन मोटर सायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये अभय उत्तम बाठे ( वय ३२ वर्ष रा. कापूरव्होळ ) यांनी तक्रार दाखल केली आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २०/७/२४ रोजी पहाटे ३:३० वा चे पूर्वी कापुरव्होळ ता.भोर जि. पुणे गावच्या हद्दीतील पुणे सातारा सेवा रस्त्याशेजारील तुषार देवघरे यांच्या समर्थ फ्लेक्स सेंटर समोर पार्किंग केलेली मोटरसायकल क्रमांक एम एच १२ एल आर ३०७० ही गाडी अज्ञात चोरट्याने पहाटे चोरून नेली आहे.
या गाडीची किंमत अंदाजे ४०००० रुपये च्या आसपास आहे.
याबाबत यांनी राजगड पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद दिली आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मदने नाना करीत आहेत.


