सत्यजितसिंह पाटणकर युवा मंचच्या माध्यमातून मेंढोशी येथील जळीतग्रस्त कुटुंबीयांना मदतीचा हात


 

सातारा पाटण प्रतिनिधी: शंकर माने

४ दिवसांपूर्वी मेढोंशी येथील सिताराम विठ्ठल जाधव यांच्या दुभत्या जनावरांच्या गोठ्यास आग लागून त्यांची ४ जनावरे होरपळली. यापैकी २ जनावरे मृत्यू पावली तर २ जनावरे अद्यापही अत्यावस्थ अवस्थेत आहेत. याबरोबरच जनावरांच्यासाठी साठवलेला चाराही या आगीमध्ये जळून भस्मसात झाला आहे. जाधव कुटुंबियांचा उदरनिर्वाह या जनावरांच्या दुधावरच असल्याने हे कुटुंब आर्थिकदृष्ट्या खुप अडचणीत आले आहे. या कुटुंबाला मदतीचा हात देण्यासाठी सत्यजितसिंह पाटणकर युवा मंचचे कार्यकर्ते पुढे आले असून त्यांनी जाधव कुटुंबियांना आर्थिक मदत देऊन मदतीचा हात दिला आहे. सत्यजितसिंह पाटणकर युवा मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक भान ठेवून केलेली ही मदत कौतुकाचा विषय आहे. यावेळी युवा मंचच्या वतीने आवाहन करण्यात आले की या अडचणीत सापडलेल्या जाधव कुटुंबियांना सर्वांनी जास्तीत जास्त मदत करावी जेणेकरून त्यांना या संकटातून बाहेर पडता येईल.

ADVERTISEMENT

यावेळी शिवाजी पवार, उपसरपंच संतोष जाधव, मंदुरे विकास सोसायटी चे चैरमन सूरज पाटणकर , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे अध्यक्ष संदीप लोहार , समाधान गुजर , विश्वजीत पाटणकर, अक्षय मोरे, आदिनाथ सूर्यवंशी , विशाल पवार , मंगेश सुतार , योगेश सूर्यवंशी , रवींद्र पवार , संतोष जाधव , आत्माराम जाधव, तत्याबा पवार ,यशवंत जाधव विजय जाधव, शेतकरी, ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

मेंडोशी येथील जळीतग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला व लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचा विश्वास दिला. यावेळी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. अत्यंत विदारक दृश्य होते. दरवर्षी उन्हाळ्यात एखादी तरी अशी घटना पाटण तालुक्यात घडत असते. अशा घटनांमुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाची होरपळ होते. माझी सर्व शेतकरी बंधू-भगिनी विनंती आहे उन्हाळा कडक आहे आपण सर्वांनी चारा साठा घरापासून व जनावरांच्या गोटयापासून थोड्या दूर अंतरावर करावा, शॉर्ट सर्किट लागून आग लागणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांच्या गोटयापासून चूल, आगीचे बंब लांब असावेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!