खंडाळा तालुक्यातील वाठार बु. येथे लोणंद पोलीसांनी केली गुटख्याची कारवाई.


 

खंडाळा : धर्मेंद्र वर्पे

 

लोणंद येथे पेट्रोलिंग करत असताना शासकीय वाहनामध्ये स.पो. निरीक्षक सुशील बी.भोसले यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा याने त्याचे घराचे शेजारी असलेल्या शेडमध्ये अवैदय रित्या गुटख्याचा साठा करुन ठेवला आहे त्या बातमीचे आधारे विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा यांचे घराचे पश्चिम बाजुस असले पत्राचे शेडमध्ये अचानक २१.१५ वाजता छापा टाकला तेथे विशाल चंद्रकांत गाढवे वय ४१ रा. वाठार बु. ता. खंडाळा हा मिळून आला. सदर शेडची झडती घेतली असता शेडमध्ये कुरकुरेच्या पुढयांचे खालील बाजुस लपवून ठेवलेल्या सात लहान मोठ्या गोणीमध्ये ४९९५२/- रुपये किंमतीचे गुटखा मिळुन आला आहे. सदर बाबत लोणंद पोलीस ठाणे मध्ये अन्न सुरक्षा व मानक कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यामध्ये विशाल चंद्रकांत गाढवे रा. वाठार बु. ता. खंडाळा यास अटक करण्यात आले असुन त्यास खंडाळा न्यायालयासमोर हजर केले असता त्याची दिनांक २९.०४.२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

 

सदरची कारवाई मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, मा. आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, राहुल रा. धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांचे मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुशिल बी. भोसले सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार नितीन भोसले, धनाजी भिसे, महिला पोलीस प्रिया नरुटे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!