भोर तालुक्यातील राजापूर गावात अखंड हरिनाम सप्ताहाची ५५ वर्षाची परंपरा कायम.
मंगेश पवार
सारोळे प्रतिनिधी : भोर तालुक्यातील सारोळे ते वीर महामार्ग लगत तालुक्यातील पश्चिम भागातील ऐतिहासिक राजापूर गाव वसलेले आहे. या गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ, तरुणवर्ग, आणि महिला वारकरी सांप्रदायिक आहेत. ग्रामीण भागामध्ये वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा अजूनही राजापूर गावातील ग्रामस्थांनी अखंडितपणे चालू ठेवली आहे.
अखंड हरिनाम सप्ताहाचे चालू वर्षात ५५ वे आहे. यामध्ये पहाटेपासून काकड आरतीचे नियोजन केलेले असते. यामध्ये गावातील सर्व तरुण, ज्येष्ठ नागरिक,महिला मंडळ आणि लहान मुले मोठ्या उत्साहाने मंदिरामध्ये पहाटे ४ वाजता हजर राहून पांडुरंगाचे नामस्मरण करत असतात.

या अखंड हरिनाम सप्ताह चे नियोजन ग्रामस्थ मंडळ राजापूर करतात.
या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये नामांकित प्रवचनकार व कीर्तनकार बोलवले जातात. त्यामध्ये तेजश्रीताई रवळेकर, संतोष महाराज बाठे, रूपालीताई गावडे, अंकुश महाराज इवरे, पल्लवीताई साळुंखे, अशोक महाराज पवार, डॉ.ज्ञानेश्वर महाराज महाडिक( सारोळे ) यांचे प्रवचन झाले.
त्याचप्रमाणे कीर्तनासाठी नामांकित महाराज बोलवले होते. ह्यावेळी बोलवलेले महाराज हे नामकित असुन कोणी डाॅक्टरेट पद्ववी मिळवलेले,कोणी प्राध्यापक, शिक्षकी पेशातील ही मंडळी होती.किर्तनकारांनी राजापुर गावातील लोकांची मने जिकली असे प्रबोधन केले.प्रबोधनाच्या माध्यमातून समाजातील प्रश्न,आजची तरूणाईला असणारे मार्गदर्शन,आई वडिलांची सेवा,आणि तरूण मुलींना पळुन जाताना आपल्या आई वडिलांचा विचार करून निर्णय घ्यावा.असे मार्गदर्शन केले.तरूणांनी व्यसनाच्या आहारी न जाता आपल्या हाताला रोजगार मिळेल व आपले प्रपंच चालेल.असे उद्योगधंदे करावेत.आजच्या भिषण परिस्थिती उद्भवणारी म्हणजे शेतकऱ्यांचा मुलाला मुलगी मिळेना पण भविष्यात शेतकऱ्यांचा मूलगाच राजा असेल.ज्याच्याकडे शेती असेल.तो श्रीमंत असेल.त्यामुळे महिलांनी शेतकऱ्यांच्या मुलालाच मुलगी द्या.हे वचन राजापुरांकडुन घेतले.
शेवटच्या दिवशी काल्यासाठी माहेरी गेलेल्या मुली तसेच कामानिमित्त पुणे मुंबई बाहेर गावी असणारे युवक व ग्रामस्थ सर्वजण सुट्टी काढून उपस्थित राहतात.आणि गावातील फेरीमध्ये सहभागी होतात.
शेवटी नगरप्रदक्षिणा घालून महाप्रसाद घेतला जातो आणि कार्यक्रमाचे सांगता केली जाते.
यावेळी उपस्थित विणेकरी चोपदार
तसेच पंच कमिटी संरपंच बाळासाहेब बोबडे,ॲड पांडुरंग बोबडे, हर्षद बोबडे सर ,संतोष बोबडे, सुनिल मोरे,गणेश पवार,दादा पवार,दिलीप बागल,मोहन मोरे, चंद्रकांत बोबडे,श्रीरंग बागल, अर्जुन बोबडे, शांताराम खुटवड, महेश बोबडे, अशोक बोबडे, नवनाथ खूटवड,विजय मांढरे, बाळासाहेब खुटवड, सुरेश बागल,प्रमोद बोबडे, रामदास बोबडे,सुधाकर गुडगुडे, सचिन खुटवड,माऊली बोबडे, भरत बोबडे इत्यादी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित असतात.


