सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : स्थानिक स्वराज्य निवडणुका रद्द नाही!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरक्षणाच्या मर्यादा ओलांडल्याबाबत दाखल झालेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाने आज (शुक्रवार, 28 नोव्हेंबर 2025) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनेक दिवसांपासून राज्यभरात निवडणुका रद्द होतील का? स्थगिती मिळणार का? अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र या गोंधळाला सुप्रीम कोर्टाने पूर्णविराम दिला आहे.
सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट आदेश :
नगरपरिषद, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींवर कोणतीही स्थगिती नाही.
निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसारच पार पडतील.
आरक्षण मर्यादा ओलांडल्याबाबतची पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे.
तोपर्यंत निवडणुका थांबवणे किंवा रद्द करणे प्रशासकीयदृष्ट्या प्रश्नात नाही.
या निर्णयानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. विविध पक्षांकडून प्रचार, रणनीती आणि उमेदवारीसंदर्भातील हालचाली आता गतीने सुरू होतील. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेलाही या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेली अनिश्चितता पूर्णपणे दूर झाली असून लोकशाही प्रक्रियेला आता वेग मिळणार आहे.


