प्रहार जनशक्ती पक्ष व अपंग क्रांती संघटना भोर छत्रपती संभाजीनगर इथे दिव्यांग मोर्चात हजारो बांधव सामील होणार.
कार्यकारी संपादक :सागर खुडे
भोर :प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली दि. ९ ऑगस्ट रोजी संभाजी नगर येथे दिव्यांग मोर्चा काढण्यात येणार आहे. भोर तालुक्यातील हजारो दिव्यांग बांधव सहभागी होणार असल्याचे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुका अध्यक्ष बापू कुडले यांनी सांगितले.
यासाठी पुणे जिल्ह्यातील दिव्यांग, निराधार, शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका उपाध्यक्ष श्री. अजय कांबळे यांनी ९९२१६०११४५ या नंबरवर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.
दिव्यांग बांधवांच्या मानधनात वाढ करून प्रतिमहिना ६ हजार रुपये करावा. विनाअट घरकुल देण्यात यावे, भूमिहीन दिव्यांगांना एक गुंठा जागा द्यावी, सरकारी जागेमध्ये व्यवसाय करण्यासाठी जागा द्यावी, या सर्व शेतकरी शेतमजुरांच्या असे विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली संभाजी नगर इथे दिव्यांग आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.
अजय कांबळे प्रहार जनशक्ती पक्ष उपाध्यक्ष