शिंदेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा! स्वप्नाली बाठेची कॅनॉल इन्स्पेक्टर पदी निवड.
खंडाळा : धर्मेंद्र वर्पे
खंडाळा तालुक्यातील महामार्ग लगत असणाऱ्या शिंदेवाडी येथील बाळासाहेब बाठे या शेतकऱ्याची मुलगी स्वप्नाली हिची महाराष्ट्र लोकसेवा का आयोगातर्फे सन २०२३ साली घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेतून जलसंपदा विभागात कॅनॉल इंस्पेक्टर पदी निवड झाली आहे. मूळचे भोर तालुक्यातील केंजळ गावचे रहिवासी असणारे बाळासाहेब बाठे हे कामानिमित्त शिंदेवाडी गावात वास्तव्यास आले होते. तिच्या यशस्वी वाटचालीतून शिंदेवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून गावच्या वैभवात वाढ केली आहे. घरी जेमतेम उपजीविका भागवण्यासाठी असणाऱ्या शेतीमुळे बाळासाहेब बाठे यांना शिक्षणाचे महत्त्व समजल्याने त्यांनी घरातील इतर कामे बाजूला ठेवून मुलांना शिक्षणाचे बाळकडू दिले.
स्वप्नालीचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेत झाले, तर उच्च शिक्षण लोणावळा येथील डी वाय पाटील कॉलेजला झाले. उच्च शिक्षण तळेगाव दाभाडे आणि कृषी क्षेत्रात बीएससी पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली होती. स्वअध्ययन करून घरीच स्पर्धा परीक्षेची तयारी करून यशाला गवसणी घातली.शिक्षण घेताना भाऊ व आई-वडिलांची तसेच भोर पंचायत मा.उपसभापती रोहन बाठेच मार्गदर्शन मिळालेच तिने सांगितले.
कालवा इन्स्पेक्टर पदी जरी निवड झाली असली तरी पुढे अभ्यास चालू ठेवण्याचा मानस स्वप्नाली हिने बोलून दाखवला.
मुलगी जलसंपदा पाटबंधारे खात्यात इन्स्पेक्टर झाल्याचे समजताच आनंद आई-वडिलांना गगनात मावेना.
स्वप्नाली बाठे ची निवड झाल्याचे समजताच समाधान वाटले. गावातील ती पहिलीच महिला अधिकारी आहे. तिने आमच्यासह गावाचे नाव उज्वल केले आहे. स्वप्नालीची निवड झाल्याबद्दल शिंदेवाडी गावात ग्रामस्थ, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांनी जल्लोष साजरा केला.
माऊली शिंदे मा. सरपंच ग्रामपंचायत शिंदेवाडी