सातारा जावली मतदारसंघात मराठा समाजाकडून अनिल करंदकर इच्छुक


 

प्रतिनिधी : बजरंग चौधरी

राज्यामध्ये सर्वत्र विधानसभेचे वारे वाहू लागल्याने अनेक मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी विविध पक्षांमध्ये कंबर कसली आहे त्याचबरोबर सातारा जावळी मतदारसंघासाठी अनेक पक्षातील नेते इच्छुक असून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात मराठा आरक्षण बाबत सरकारने निर्णय न घेतल्यास सर्वत्र उमेदवार देऊन विधानसभेची निवडणूक लढवण्याची संकेत दिले होते या अनुषंगाने सातारा- जावळी मतदारसंघातून अनिल करंदकर (पाटील) यांनी आपला इच्छूक अर्ज मनोज जरंगे पाटील यांना दिला आहे .

ADVERTISEMENT

सातारा जावळी मतदारसंघात मोठा जनसंपर्क असलेले जेष्ठ पत्रकार अनिल करंदकर हे विधानसभेच्या मैदानात उतरल्यास त्याचा मोठा फटका इतर पक्षांनाही बसू शकतो असा विश्वास तालुक्यातील मराठा कार्यकरत्यांना वाटत आहे अनिल करंदकर हे सातारा जिल्ह्यात अखिल भारतीय मराठा महा संघाच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यात आपला जनसंपर्क वाढवला आहे त्याचबरोबर द युवा ग्रामीण पत्रकार संघात अनिल करंदकर हे राज्य कार्याध्यक्ष म्हणून काम करत आहेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमी सडेतोड लिखाण करून अनेक प्रश्न सोडवले आहेत पत्रकार तसेच सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारे अनिल करंदकर यांनी आपला इच्छुक अर्ज मा.जरांगे पाटील यांना दिला आहे. सातारा जावळी मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तयारी दर्शवली आहे

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास समाजाच्या वतीने मी उमेदवारी अर्ज दाखल करून वरिष्ठांच्या आदेशानुसार समाजासाठी काम करेल अशी इच्छा अनिल करंदकर यांनी व्यक्त केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!