न्हावी ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवाजी भालेराव यांची निवड.
सारोळे : भोर तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या न्हावी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी शिवाजी बापूराव भालेराव यांची निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच सीमा भोसले यांच्यावर सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे यांच्या न्यायालयात त्यांना अपात्र केले होते.न्हावी ग्रामपंचायत त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शनिवार (दि.३१ )रोजी दुपारी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच उर्मिला कारळे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी शिवाजी बापूराव भालेराव यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने भालेराव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

यावेळी भोर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी यावेळी नवनियुक्त उपसरपंच शिवाजी बापूराव भालेराव यांचा सत्कार केला व पुढील कालावधीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच उर्मिला दत्तात्रय कराळे,गणेश उत्तम सोनवणे,शीतल सुरेश सोनवणे,अनिता जितेंद्र सोनवणे, जेष्ठ कार्यकर्ते विजय सोनवणे ग्रामसेवक विजय कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनवणे, मिलिंद तारू, महादेव वेदपाठक उपस्थित होते.


