शिवजयंती उत्सव 2025 मोरवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.


मंगेश पवार

दि.15 सारोळे -: मोरवाडी येथे सलग 19 व्या वर्षी शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. उत्सवानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यक्रम होणार आहेत.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता दुर्ग वितरण गड (तिकोना) येथून शिवज्योत मोरवाडी येथे येणार आहे. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने संध्याकाळी ५ वाजता शिवज्योत व पालखी मिरवणूक काढणार आहे. सायंकाळी सात वाजता शिवजन्म सोहळा व आरती घेण्यात येणार आहे. व रात्री नऊ वाजता आदर्श शिवकन्या पुरस्कृत महाराष्ट्र राज्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे करंडक महाराष्ट्र राज्य प्रथम विजेती शिवकन्या स्वप्तिका विक्रम भोसले यांचे शिवचरित्र व्याख्यान होणार आहे.

ADVERTISEMENT

 

त्याचप्रमाणे 20 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9 वाजता वार्षिक स्नेहसंमेलन हा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरवाडी येथे होणार आहे. 21 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी पाच वाजता हरिपाठ व रात्री सात ते 9 वाजता महाप्रसाद त्यानंतर ह.भ.प शिवलीला पाटील यांचे शिवचरित्र कीर्तन होणार आहे.

 

कार्यक्रमाचा लाभ मोरवाडी किकवी पंचक्रोशी पंचक्रोशी व सर्व शिवभक्त यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती यांनी केले आहे.संयोजक शिवजयंती उत्सव समिती मोरवाडी व ग्रामस्थ मंडळ मोरवाडी यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!