१२ तासांत खून प्रकरण उघडकीस – राजगड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी


दि. 21भोर :- शिंदेवाडी गावच्या हद्दीत जुन्या कात्रज बोगद्याच्या अलीकडील डोंगरावर एका तरुणाचा खून करून प्रेत टाकल्याची घटना समोर आल्यानंतर अवघ्या १२ तासांत राजगड पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत गुन्ह्याची उकल केली आहे.

राजगड पोलिस स्टेशनच्या हद्दीत सकाळी डोंगरावर फिरायला गेलेल्या पादचार्‍याला एका अज्ञात तरुणाचा मृतदेह दिसला. आंबेगाव पोलिसांनी याची माहिती राजगड पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. उपविभागीय पोलिस अधिकारी राजेद्रसिंह गौर यांनीही घटनास्थळी भेट दिली.

तपासातून मृताची ओळख सौरभ स्वामी आठवले (२५, रा. मांगडेवाडी, पुणे, मुळ गाव सोलापूर) अशी पटली. तो १८ ऑगस्ट रोजीपासून बेपत्ता होता. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार पोलिसांनी संशयितांचा शोध घेऊन त्यांना गोगलवाडी येथून ताब्यात घेतले.

अटक आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

1. श्रीमंत अनिल गुज्जे (२१, रा. वडगाव मावळ)

2. संगम नामदेव क्षीरसागर (१९, रा. वडगाव मावळ)

ADVERTISEMENT

3. नितीन त्र्यंबक शिंदे (१८, रा. गोकुळनगर, कात्रज, मुळ रा. लातूर)
तसेच तीन विधीसंर्घषित बालकांची (अ), (ब), (क) या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

तपासात उघड झाले की, विधीसंर्घषित बालक (अ) याचे मांगडेवाडीतील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मृत सौरभ आठवले हा त्या मुलीला बहिण मानून तिला शाळेत सोडणे-आणणे करत होता. ही बाब (अ) ला न पटल्याने रागातून सौरभचा खून करण्याचा कट रचला गेला. आरोपींनी सौरभला बोलावून डोंगरात नेले आणि कोयत्याने तसेच इतर हत्यारांनी त्याचा खून केला.

गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी व तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना भोर न्यायालयात हजर केले असता त्यांना २८ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी राजेद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. राजगड पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी, सहा. निरीक्षक तुकाराम राठोड, उपनिरीक्षक अजित पाटील, वृषाली देसाई तसेच पोलीस अंमलदार सागर गायकवाड, सागर कोंढाळकर, नाना मदने, राहुन कोल्हे, अजित माने, निलेश राणे, अमोल तळपे, अजिज मेस्त्री, अक्षय नलावडे, राहुल भडाळे, मंगेश कुभांर यांनी केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!