भोर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या प्रचारासाठी भोर येथे जाहीर सभा मोठ्या गर्दीत संपन्न.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
आमदार करा एका वर्षात भोरमध्ये एमआयडीसी करणार ; कुलदीप कोंडे
दि. 5 भोर प्रतिनिधी :. भोर या ठिकाणी भोर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांच्या जाहीर प्रचार सभा भोर येथील आर आर विद्यालय मैदानावर संपन्न झाली, त्याप्रसंगी कुलदीप कोंडे बोलले कि,गुंजवणी वाजेगर उपसा सिंचन योजनेबाबत आश्वासन, शिवगंगा उपसा सिंचन योजनेबाबत आश्वासन , भोर वेल्हे मुळशी तालुक्यातील तरुणांना रोजगार देण्याच आश्वासन हे दिले जातं मात्र ते काम केलं जात नाही.तरुण पोरांना शेतीची आवड का निर्माण होत नाही तर लोकप्रतिनिधी शेतीसाठी पाणी आणि रस्ता उपलब्ध करून दिला पाहिजे.हे असले धंदे बंद करा आणि रस्त्याला खड्डे असले कि पवार कुटूंबालावर आरोप करायचे आणि चांगले असले कि आपण कार्यसम्राट आमदार बोलायच.विकासाच्या बाबतीत देखील भोर विधानसभा मतदारसंघ मागे आणि मागास आहे.
का 15 वर्षात विकास झाला नाही, थोपटे साहेबांनी संस्था उभ्या केल्या त्या यांना टिकवता आल्या नाही, आणि सांगतात कार्यसम्राट आमदार, कायम जनतेला फसवल आहे आम्ही जनतेला फसवणार नाही, मला निवडून द्या 1 वर्षात MIDC करणार.त्यासाठी मतदारांनी परिवर्तनासाठी सज्ज राहून अपक्ष उमेदवार म्हणून मला मतदान करावे असे आवाहन अपक्ष उमेदवार कुलदीप कोंडे यांनी केले.
यावेळी शिवव्याख्याते अर्चना भोर यांचं भाषण अंगावर काटा आणण्यासारखं झालं.
याप्रसंगी माजी नगरसेवक राजाभाऊ पासलकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, व्यखाते अर्चना भोर कारंडे, गणेश धुमाळ, पूनम पांगारे, माजी उपसभापती अमोल पांगारे राजगड तालुका शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दत्ताभाऊ देशमाने शिवसेनेचे कार्यकर्ते प्रशांत दानवले, सचिन बांदल भोर तालुका राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र भोरडे,, प्रहार उपाध्यक्ष अजय कांबळे, राकेश गाडे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक बर्डे, विलास बापू मरळ, नारायण काका कोंडे, मा. सरपंच विकास चव्हाण,कापूरहोळ गावचे युवा उदयोजक अमित गाडे,काळूराम भगत, रुपेश भगत , महेश कोंडे, वासुदेव कोंडे, बाळासाहेब जायगुडे, दत्तात्रेय खुटवड, डॉ. अतुल जाधवराव, स्वाती जाधवराव, संग्राम कोंडे अमोल कोंडे राजगड मुळशी तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल कोंडे सूत्रसंचालन सुरज जगताप यांनी केले.