प्रहार जनशक्ती पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवेदनाची दखल; भोरमधील गॅस एजन्सीची पुरवठा विभागाकडून तातडीने तपासणी!


मंगेश पवार

भोर तालुक्यातील गॅस ग्राहकांच्या तक्रारींनंतर, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या निवेदनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांना निवेदन दिल्यानंतर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रितम गायकवाड पुरवठा निरीक्षण अधिकारी भोर यांच्या अध्यक्षतेखाली तत्काळ तपासणी पथक स्थापन करण्यात आले. ​या पथकाने संबंधित गॅस एजन्सीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी एजन्सीच्या कामकाजात पारदर्शकता ठेवण्याच्या आणि ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

​यावेळी भोलावडे येथील सामाजिक कार्यकर्ते अस्लम अतार निलेश कदम, प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुक अध्यक्ष अजय कांबळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सामान्य नागरिकांच्या प्रश्नावर प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेबद्दल अस्लम अतार निलेश कदम, अजय कांबळे आणि समस्त नागरिकांनी तहसीलदार आणि पुरवठा विभागाचे आभार मानले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!