“भोर-पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा; रस्त्यांना नवा वेग – मा.आमदार संग्राम थोपटे यांचा पुढाकार”
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भोर: आंतरराष्ट्रीय दर्जाची Pune Grand Challenge Tour 2024 सायकल स्पर्धा येत्या काळात पुणे जिल्ह्यात पार पडणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने भोर आणि पुरंदर विधानसभेत रस्त्यांच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या स्पर्धेत तब्बल 50 देशांचे सायकलपटू सहभागी होणार असून, ही भारतातील प्रथमतः ऑलिम्पिक दर्जाची आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा ठरणार आहे. स्पर्धेचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.
भोर विधानसभा मतदारसंघासाठी 121 कोटी तर पुरंदर-हवेली मतदारसंघासाठी 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रस्त्यांचे रुंदीकरण 7 मीटरपर्यंत होणार असून, दिशादर्शक फलक तसेच रोजगार निर्मितीसाठी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.
या विकासामुळे भोर-पुरंदर भागातील ग्रामीण पर्यटन, रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
. स्पर्धेच्या स्टेजेस
स्टेज 1 (पुणे – हवेली – पीसीएमसी)
सुरुवात : श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी
मार्ग : स्पाईन रोड → पीसीएनटीडीए सर्कल → भक्ती शक्ती चौक → संत तुकाराम महाराज पूल → शनिवार वाडा → विद्यापीठ चौक → नळस्टॉप चौक → भेळके चौक
अंतर : 99.15 किमी | उंची : 560 मी.
समाप्ती : बालगंधर्व रंगमंदिर, JM रोड
स्टेज 2 (मुळशी – मावळ – पीसीएमसी)
सुरुवात : TCS सर्कल, हिंजवडी फेज 3
मार्ग : टिकोनापेठ → हादशी लेक → पौड → अंबडवेट गाव कमान → बेबढळ → चांदखेड → नेरे मरुंजी → दांगे चौक → भुमकर चौक → लक्ष्मी चौक
अंतर : 91.8 किमी | उंची : 956 मी.
समाप्ती : डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय संस्था, आकुर्डी
स्टेज 3 (पुणे – पुरंदर – राजगड – हवेली)
सुरुवात : द लेडीज क्लब, कॅम्प
मार्ग : गोलीबार चौक → अंबवणे → कापूरहोल → नारायणपूर → सिंहगड घाट रस्ता → शिवापूर → कोंढवा → खडकवासला लेक व्ह्यू पॉईंट
अंतर : 109.15 किमी | उंची : 1466 मी.
समाप्ती : नांदेड सिटी, सिंहगड रोड
स्टेज 4 (पुरंदर – बारामती)
सुरुवात : चंदन टेकडी, सासवड
मार्ग : सासवड → सुपे → मोरगाव → कडेपाथर → पानवडी घाट → मांढर → वाळ्हे → पिसुर्ती → खंडोबानगर → वांजरवाडी → कान्हेरी
अंतर : 137.07 किमी | उंची : 820 मी.
समाप्ती : विद्या प्रतिष्ठान आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, बारामती
पत्रकार परिषदेत भाजपा नेते माजी आमदार संग्राम थोपटे, पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप, जीवन कोंडे,बाळासाहेब गरुड, संतोष धावले, संदीप कटके आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या स्पर्धा आणि विकासनिधीविषयी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.
मा.आमदार संग्राम थोपटे यांनी भोर-पुरंदर भागात या स्पर्धेचे आयोजन व्हावे व त्यातून ग्रामीण रस्ते विकास साधावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या भागाला कोट्यवधींचा विकासनिधी मिळाल्याचे स्थानिक नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.


