10 ऑक्टोबर जागतिक मानसीक आरोग्य दिनानिमित्त सातारा जेलमध्ये मानसिक ताणतणाव मुक्त शिबीर आयोजन.
संभाजी गिरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी
सातारा जिल्हा कारागृहामध्ये दिवस-रात्र 24 तास गंभीर व संवेदनशील गुन्ह्यांमधील आरोपींमध्ये काम करत असताना अनेक प्रकारचे मानसिक ताण तणाव निर्माण होत असतात. सदरचा मानसिक तणाव दूर कसा करता येईल याबाबत सातारा जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञ व इतर संबंधितांनी कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांना याबाबत मार्गदर्शन केले.
सदरचे शिबिर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश श्रीमती नीना बेदरकर, जिल्हा शल्य चिकित्सक युवराज करपे व कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने घेण्यात आला.
सदर कार्यक्रमास डॉ. देविका नायर, मानसोपचार तज्ञ, जिल्हा रुग्णालय सातारा, अपर्णा संभुदास, समाजसेवक अधीक्षक, जिल्हा रूग्णालय सातारा, शोभा चव्हाण, मनोरुग्ण तज्ञ परिचारिका, जिल्हा रुग्णालय सातारा, अपर्णा बल्लाळ, मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा रुग्णालय सातारा, ॲड. आशिष राठोड, सहाय्यक जि. वि.से. प्रा. समिती, ॲड. अमृता ताठे, सहाय्यक जि. वि.से. प्रा. समिती इत्यादी हजर होते. तसेच कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे, सुभेदार दत्ताजी भिसे व अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.


