मोरवाडी गावात 200 केव्हीए रोहित्र बसविण्यासाठी आ. संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून महावितरणाला निवेदन.


 

दि. ११ भोर तालुक्यातील पुणे सातारा महामार्ग जवळ मौजे मोरवाडी येथील घाडगे मळा आणी कारळे घराजवळील DP रोहित्राची क्षमता १०० केव्हीए वरुण वाढवून २०० केव्हीए मिळनेबाबत भोर, राजगड़,मुळशी चे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांच्या माध्यमातून मुख्य अभियंता सासवड मा.गवई, पवार यांना निवेदन देण्यात आले.

 

मोरवाडी गावात रोहित 100 केव्हीए क्षमतेचे असल्याने कमी दाबाने विद्युत पुरवठा व्हायचा,वीज पुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण येत होत्या.

ADVERTISEMENT

रोहित्रावर अतिरिक्त विजेचे भार आल्याने मोरवाडी गावात कमी होल्टेज येत असल्याकारणाने नागरिकांना अडचण निर्माण होत होती.ग्रामस्थांनी भोर राजगड, मुळशी कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांना 200 केव्हीए रोहित्र साठी पाठपुरावा केला.

 

यावेळी मोरवाडी गावातील युवक काँग्रेस उपाध्यक्ष मयुर शरद मोरे,बाळासाहेब मोरे,सरपंच अशोक मोरे,किकवी मोरवाडी सोसायटी सदस्य लक्ष्मण मोरे,मा सदस्य मोरवाडी उत्तम तुकाराम मोरे तंटामुक्ती उपाध्यक्ष आकाश मोरे, रणजित मोरे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!