सत्यशोधक बहुजन आघाडीचा वर्धापन दिन आणि आदिवासीं कार्यकर्ता मेळावा उत्साहात संपन्न….


 

कार्यकारी संपादक: सागर खुडे

 

१५ऑक्टोंबर रोजी भोर चौपाटी येथे सत्यशोधक बहुजन आघाडीचा २६ वा वर्धापन दिन आणि आदिवासीं कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.यावेळी जो पक्ष आमच्या मागण्या त्यांच्या जाहीरनामा मध्ये घेईल त्यांच्या साठी आम्ही काम करु असे ठरविण्यात आले,

यामध्ये आदिवासी कातकरी ज्या ठिकाणी राहत असतील तेथे घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देणार, तसेच प्रत्येकी आदिवासी वस्तीत मुलभूत सुविधा पाणी,लाईट रस्ता,स्वच्छतागृह बांधून देणार,भोर मुळशी मध्ये स्वांतत्र्यवीर नाग्या म्हादु कातकरी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुर्णाकृती पुतळा उभा करणार,आदिवासी प्रकल्प विभाग कार्यालय घोडेगाव मधुन स्थलांतरित करून त्याचे पुणे येथे मुख्य कार्यालय नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार, त्याचप्रमाणे आदिवासी कातकरी,भटके मागासवर्गीय विद्यार्थींची शिक्षणाची जबाबदारी घेणार,शासकीय योजनेत आदिवासी कातकरी यांचा संख्याक वाढवणार,

ADVERTISEMENT

आदिवासी महामंडळातुन आदिवासी कातकरी उन्नती साठी एक लाख रुपये कर्ज थेट स्वरूपात हस्तांतरित करणार इत्यादी मागण्या महत्वाचे पक्ष यांच्या कडे करणार असे स्वागताध्यक्ष नागेश गायकवाड यांनी सांगितले. तसेच आघाडी चे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे यांनी या भागातील आदिवासी भटके मागासवर्गीय अजून ही प्रवाहाच्या बाहेर आहेत त्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्या पुर्ण झाल्याशिवाय या भागातील उपेक्षित वंचित समाज परिवर्तनाच्या वाटेवर येणार नाही असे सांगितले. यावेळी आदिवासी कातकरी जातीचे ११० वेगवेगळे दाखले वाटप केले तसेच मोफत डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करून शेकडो लोकांना मोफत चेष्मे वाटप केले.

यावेळी भोरचे माजी नगराध्यक्ष गितांजली शेटे,माजी नगरसेवक बापु शेटे तसेच संघटनेचे शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मेळाव्या साठी गणपत काटेकर दशरथ मुकणे,बायडाबाई मुकणे अजय पवार राहुल सोनवणे यांनी नियोजन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!