भोर तालुक्यात पांडे येथे नवीन विद्युत उपकेंद्र स्थापनेची मागणी – शिव प्रहार प्रतिष्ठान.


संपादक: मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

सारोळे (भोर) – सारोळे पंचक्रोशीतील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिव प्रहार प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महावितरण कंपनीला पांडे येथे नवीन विद्युत उपकेंद्र स्थापन करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.

 

ही मागणी ग्रामपंचायत पांडे यांच्या १६ जून २०२५ रोजी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने करण्यात आली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की सारोळे, सावरदरे, पांडे, राजापूर, भोंगवली, भांबवडे, न्हावी, टापरेवाडी, हिंगेवाठार, गुनंद या गावांमध्ये वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने होतो. त्यामुळे पंप जळणे, फ्यूज उडणे, तारा तुटणे तसेच घरगुती उपकरणांचे नुकसान वारंवार होत आहे. यामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ADVERTISEMENT

 

या वाढत्या समस्येकडे स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांत नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, मौजे पांडे येथे नवीन विद्युत उपकेंद्र स्थापन केल्यास या पंचक्रोशीतील वीज समस्या कायमची दूर होऊ शकते. यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शवली आहे. यावेळी पांडे गावातील ग्रामस्थांचे  संतोष मोहिते यांनी आभार मानले.

 

निवेदनाची प्रत बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता, सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता, तसेच महावितरण किकवीचे कनिष्ठ अभियंता यांना देण्यात आली आहे.

 

यावेळी शिव प्रहार प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष ज्ञानोबा मोहिते यांच्या बरोबर पांडे गावचे युवा सरपंच तेजस साळुंके आणि सावरदरे सरपंच गणेश साळुंखे यांनी निवेदन दिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!