पुणे येरवडा कारागृह अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक 2025 मध्ये स्वराज्य पॅनल विजयी.


दि. 21 पुणे :- कारागृह अधिकारी कर्मचारी सहकारी पतसंस्था निवडणूक 2025 मध्ये स्वराज्य पॅनल चे मनोज गायकवाड,वसीम इनामदार ,अतुल पटेकर,प्रमोद इंगळे,प्रमोद जानराव,योगेश पाटील,दौलत खिलारे, भरत बंडगर हे उमेदवार कपबशी चिन्हावर निवडून आले तर महिला राखीव मधून प्रणाली कोकाटे, लीला धुमाळ यांची तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात साहेबराव वाळकुळे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली असून सर्वात तरुण उमेदवार म्हणून मनोज गायकवाड ठरले असून सर्वाधिक मतांनी ते महाराष्ट्रातून एक नंबर ने निवडून आले एकूण मताच्या 84% मतदान त्यांना झाले असून विद्यमान चेअरमन

बाजीराव पाटील यांचे पॅनल ला पराभूत पत्करावा लागला त्यामध्ये

सूर्यकांत वाखारे सर्वसाधारण गट

बिलोरे मनोहर OBC प्रवर्गा

विकास कोळपे भटक्या विमुक्त जातीमधून

चिन्ह घड्याळ होते ते मोठ्या फरकाने पराहुत झाले

 

अपक्ष उमेदवार

रवींद्र सावंत सर्वसाधारण गटामध्ये

तर राजेंद्र मरळे हे OBC प्रवर्गामधून अपक्ष उमेदवार होते यांना देखील पराभव पत्करावा लागला असून स्वराज्य पॅनल च्या उमेदवारांना दणदणीत विजय मिळवता आला

ADVERTISEMENT

यामध्ये निवडणूक अधिकारी म्हणून अमर देशपांडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले .

यामध्ये संचालक पदी सर्वाधिक मतांनी निवडून आलेले तरुण उमेदवार मनोज गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून सांगण्यात आले की ही निवडणूक इतर राजकीय स्वरूपाची नव्हती मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढलो आहोत सर्व उमेदवार हे येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे कर्तव्यावर आहेत ही पतसंस्था अजून पुढे नेण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतला आहे विद्यमान चेअरमन बाजीराव पाटील यांनी देखील छान कार्यभार सांभाळला आहे ते यामध्ये संचालक म्हणून गेली 10 वर्ष काम पाहत असून एक वर्षापासून ते चेअरमन आहेत तसेच व्हा. चेअरमन रवींद्र सावंत तर सचिव अमर पाटील यांनी देखील स्वराज्य पॅनल चे उमेदवार यांना निवडून आल्यावर शुभेच्या दिल्या आहेत म्हणून आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले . तसेच आम्ही सर्वजण DIG मॅडम मा. स्वाती साठे सो अधीक्षक सुनील ढमाळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कामकाज हे प्रथम ड्युटीकर्तव्य बजावत पाहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!