नसरापूर येथे भोर-राजगड तालुका मुख्याध्यापक संघतर्फे गुणवंत शिक्षक व सेवकांचा सत्कार
दि. 4 नसरापूर :- भोर व राजगड तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीने गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर सेवक पुरस्कार समारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमास पुणे विभाग शिक्षक आमदार मा. प्रा. जयंत आसगावकर, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महासंघाचे सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजी कामथे, उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल चिकणे, मोहन ताकवले, मोहन किन्हाळे, सुभाष वाल्हेकर, तसेच भोर तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष सुनील गायकवाड, सचिव पंढरीनाथ टापरे, आणि वेल्हा तालुका मुख्याध्यापक संघ अध्यक्ष शंकर नाकती, सचिव संतोष चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रसाद गायकवाड, सचिव श्री शिवाजी कामथे यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे आमदार प्रा. जयंत आसगावकर व डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन करून सर्व गुणवंतांचा सत्कार केला.
यावेळी किकवी शिक्षण संस्था संचलित श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, किकवी (ता. भोर) येथील सेवक दीपक बाबुराव बोडरे यांचा तालुका गुणवंत सेवक म्हणून सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे जिल्हा गुणवंत पुरस्कार प्राप्त उपशिक्षिका सौ. संजीवनी सुतार यांचाही याप्रसंगी सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी किकवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय भिलारे, उपाध्यक्ष प्रशांत कोंढाळकर, तसेच संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले व त्यांच्या पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक विनोद राऊत व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


