हरिश्चंद्री ब्रिज चे काम सुरू होण्यासाठी १५ डिसेंबर २०२४ रोजी हरिश्चंद्री ग्रामस्थ बहुसंख्येने करणार लक्ष् वेधी आंदोलन.
दि. 13 डिसेंबर 24 कापूरहोळ : सातारा ते पुणे महामार्ग लगत असणाऱ्या हरिश्चंद्री येथील ब्रीज चे कामाला तात्काळ सुरूवात करावी. आपल्या अधिकारांच्या कडून/कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडूनच आज उद्या काम चालू होईल एवढं सांगून वेळ सारून मारून पुढे तारीख पे तारीख असा लपंडाव करून ग्रामस्थांची फसवणूक केली जाते आहे असा ग्रामस्थांचा आरोप आहे आणि काम नक्की चालू कधी होणार याची तोंडी तारीख दिली जाते परंतू प्रत्येक्षात त्या तारखेला काहीच होत नाही याचं प्रकरणाला कंटाळून ग्रामस्थ भव्य दिव्य लक्षवेधी १५ डिसेंबर २०२४ रोजी आंदोलन करणार असून त्याची दखल घ्यावी होणाऱ्या परिणामास राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरण व कर्मचारी हे जबाबदार असतील.
हरिश्चंद्री/कापूरहोळ गावातील ग्रामस्थांना/शाळकरी मुलांना कामानिमित्त रस्त्यावरून ये-जा करत असताना अडचण मोठ्यप्रमाणावर येत असुन राष्ट्रिय महामार्गावर आपण भूसंपादित केलेली दोन्ही बाजूची जमीन मोकळी करून पादचारी मार्गाची व्यवस्था करावी अशी देखील मागणी केली आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल व अनेक निष्पाप जीवांचे प्राण वाचतील.
तरी वरील उपरोक्त विषयाची दखल न घेतल्यास १५ डिसेंबर २०२४ रोजी आंदोलन केले जाईल असे सोशल मीडियाशी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले.


