भाजपाचे नगरसेवक “किरण दगडे” आज भरणार फॉर्म.


 

भोर : महायुतीत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्याकडून अनेकांनी भोर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यामुळे भोर विधानसभेमध्ये इच्छुकांची संख्या पाहता चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

 

भोर विधानसभा मतदार संघात सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे हे आहेत. त्यामुळे आघाडीत हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित होते, तशा आशयाचे वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच केले होते. आणि त्याअनुसार संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन प्रचारामध्ये भोर विधानसभेतील प्रत्येक वाडी रस्त्यावर,गावोगावी प्रचारास आघाडी घेतल्याचे पहावयास मिळत आहे, तर महायुतीत शिवसेना शिंदे गटाचे माजी पुणे जिल्हा परीषद सदस्य कुलदीप कोंडे, जिल्हा अध्यक्ष बाळासाहेत चांदेरे हे इच्छुक आहेत,

भोर तालुक्यातील खेडोपाडी,वाडी रस्त्यावरती, कुलदीप कोंडे यांचं पारडं जड आहे अशा आशयाची कुजबूज सर्वसामान्य जनतेमध्ये होत आहे.

ADVERTISEMENT

 

महायुतीत भाजपचे किरण दगडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे रणजित शिवतरे हे इच्छुक आहेत.

 

महायुती घटक पक्षाकडून व मित्र पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता किरण दगडे सोमवार दि. 28 रोजी फॉर्म भरणार आहे. पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता फॉर्म भरणार असल्याने सर्वसामान्य लोकांमध्ये कुजबुज आहे की किरण दगडे हे बंडाचे भूमिका मध्ये आहेत. पक्षाचा “AB”फॉर्म नसतानाही भरलेला फॉर्म अपक्ष ग्राह्य धरला जातो. फॉर्म भरल्यानंतर भाजपाची भूमिका काय असेल? किरण दगडे यांना “AB” फॉर्म माहिती पक्ष देणार का याच्या वरती लक्ष आहे. किरण दगडे यांनी फॉर्म भरल्यानंतरच समजेल महायुतीमध्ये कोण कोण बंडखोरी करणार आहे. किरण दगडे पाटील यांच्या विषयी भोर तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये सहानुभूतीची लाट आहे. भोर तालुक्यामध्ये त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना महिलांना काशीयात्रा घडवली तसेच दिवाळी सरंजाम वाटप केले. त्यासाठी भोर तालुक्यातील नागरिकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!