स्फोटक पदार्थांची वाहतूक करणारा एक जण ताब्यात भुईंज पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल .


 

वाई प्रतिनिधी

 

धोकादायकरित्या स्फोटक पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या

एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून स्फोटक पदार्थ व हुंडाई क्रेटा असा एकूण २१ लाख

६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोपट नाना बिचुकले, वय २९, रा. हणमंतवाडी ( आदर्की खुर्द), ता. फलटण, जि. सातारा असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने

ADVERTISEMENT

सातारा जिल्ह्यात अवैध शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिल्या आहेत. संशयिताच्या मुसक्या आवळल्या व वाहनासह २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!