वाईत मारहाण ; परस्पर विरोधी तक्रारी .
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई मधील उत्कर्ष बँकेच्या समोरील रस्त्यावर किरकोळ वादाच्या कारणातून दोन गटात हाणामारी झाल्या प्रकरणी वाई पोलीस स्टेशन मध्ये परस्परविरोधी तक्रारी दाखल झाले आहेत ओमकार काळे रा. नावेचीवाडी याने सचिन रामचंद्र शिंदे यांच्या विरोधात मारहाणीची तक्रार दिली तर दुसरी तक्रार सचिन शिंदे रा. नावेचीवाडी यांनी ओमकार काळे, प्रकाश गोरे, अमर सावंत, आकाश गोरे, दत्तात्रय गोरे, संतोष काळे यांच्याविरुद्ध तक्रारी दिली आहे ही घटना दि. १८ रोजी रात्री ९:४५ च्या दरम्यान घडली. किरकोळ वादातून लाकडी दांडके व लोखंडी रॉड याने हाणामारी करण्यात आल्या असे तक्रारीत म्हटले आहे.


