भोर मोहरी येथे सिद्धाश्रम मठात महाविकास आघाडीची प्रचार सभा
भोर :महाविकास आघाडीच्या जाहीर प्रचाराची सभादि.21 मार्च रोजी भोर तालुक्यातील सिद्धाश्रम मठ मोहरी बु. या ठिकाणी पार पडली.
बारामती मतदारसंघांमध्ये एक गोष्ट झाली की विकास कामे संपूर्ण मतदार संघात झाली यांचे कारण म्हणजे सगळे सहकारी आणि मित्र पक्ष या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यातून गाववाडी वस्तीवर विकास करू शकलो. एक दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विकास प्रश्न गांभीर्याने कोणी मांडत नाही. इलेक्शनचा माहोल असला तरी पाण्याची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली की, दुष्काळाची परिस्थिती जिथे जिथे तुम्हाला जाणवेल तिथे राजकीय मतभेद बाजूला ठेवून विरोधक असला तरी माणुसकीच्या नात्याने चारा छावणी, पाणी, शेतीला आणि गुरांना पाणी याच्यासाठी नियोजनाला मदत लागेल तिथे संग्राम थोपटे आणि सुप्रिया सुळे हे 24 तास हजर राहतील असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

खासदार म्हटलं की त्यांना मतदार संघाची व्याप्ती असते मतदार संघाच्या व्याप्ती बरोबर मिळणारा निधी कमी असतो परिणामी विकास कामांची वाढलेली लोकांची अपेक्षा असते आणि म्हणून एका विचाराणे काम केले तर त्या भागाचा मतदारसंघाचा परिपूर्ण विकास होऊ शकतो.त्यासाठी येणाऱ्या 7 मे ला सुप्रिया सुळे यांना मतदान करून चौथ्यांदा खासदार करून दिल्लीला पाठवायचे असे संग्राम थोपटे यांनी सांगितले.
यावेळी प्रचार सभेला कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ता. अध्यक्ष माऊली शिंदे, शरद पवार गटाचे ता.अध्यक्ष रवींद्र बांदल, काँग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, पोपट सुके, रोहन बाठे, महेश टापरे, विठ्ठल आवाळे आणि इतर उपस्थित होते.
या सभेचे सूत्रसंचालन गणेश खुटवड यांनी केले.


