न्हावी (322) ग्रामपंचायतीचा आढावा तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकांचा कार्यकाळ


दि. 8 सारोळे :-भोर तालुक्यातील कायम चर्चेत असणारी ग्रामपंचायत म्हणजे न्हावी ३२२ तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी गावाच्या विकासाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. शासनाचा निधी उपलब्ध असूनदेखील त्यांच्या कार्यकाळात कोणतीही योजना राबवली गेली नाही. केवळ खोटे बिल तयार करणे, खिसे भरणे आणि नोंदीत खोडाखोड करणे एवढेच काम त्या काळात झाले.

त्यामुळे गाव विकासाच्या बाबतीत २० वर्षे मागे राहिले. गावात संवादाचा अभाव असल्याने सतत वाद होत राहिले. परिणामी मागील काही वर्षांत अनेक ग्रामसेवक कार्यभार स्वीकारण्यास टाळाटाळ करू लागले, कारण तत्कालीन सरपंच काम करू देत नसत.

 

विद्यमान सरपंच व ग्रामसेवकांची कार्यपद्धती

 

आज विद्यमान सरपंच शितल सोनवणे आणि अभ्यासू व कार्यक्षम ग्रामसेवक विजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची कामे सकारात्मक दिशेने सुरू झाली आहेत.

 

गावातील पाणीप्रश्न आणि वीजप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न

 

रस्त्यांवरील पथदिव्यांची उभारणी

 

गावात बाकडींचे वाटप

ADVERTISEMENT

 

जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडींना निधी उपलब्ध करून साहित्य पुरवणे

 

महत्वाकांक्षी आठवडी बाजार योजना राबवून प्रत्यक्षात अंमलबजावणी → स्थानिकांना रोजगाराच्या संधी

 

या सर्व कामांमध्ये पक्षीय राजकारण बाजूला ठेवून गावातील सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची नवी कार्यपद्धती त्यांनी रुजवली आहे.

ग्रामस्थांचा विश्वास

 

गावाच्या हितासाठी तळमळीने काम करण्याची तयारी असली, तर विकास नक्की साध्य होतो याचे उदाहरण विद्यमान सरपंच आणि ग्रामसेवकांनी घालून दिले आहे.

 विजय कुलकर्णी हे मुरब्बी, चाणाक्ष आणि दूरदृष्टी असलेले ग्रामसेवक असल्याने ग्रामपंचायत शिस्तबद्ध आणि कार्यक्षम पद्धतीने चालू आहे.

 

.             ग्रामस्थांचा आभारप्रदर्शन

 

 

 

एक जबाबदार गावचा नागरिक म्हणून मी विद्यमान सरपंच, ग्रामसेवक सदस्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो की त्यांनी गावाच्या विकासाची खरी वाटचाल सुरू केली आहे.

अजय कांबळे अध्यक्ष – प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!