राजगड पोलिसांची धडाडीची कामगिरी! अवघ्या दोन तासांत सहा लाखांचा ऐवज परत – प्रहार जनशक्ती पक्षाने केले जाहीर कौतुक


संपादक : मंगेश पवार

नसरापूर :- राजगड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षम आणि तत्पर पथकाने अवघ्या दोन तासांत तब्बल सहा लाखांचा ऐवज शोधून परत करत एक उल्लेखनीय कामगिरी बजावली. ही घटना केवळ पोलिसांच्या कर्तव्यनिष्ठेचेच नव्हे, तर त्यांच्या वेगवान व परिणामकारक कार्यशैलीचे ज्वलंत उदाहरण ठरते.

 

या यशस्वी कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी केले असून, त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलिस पथकाने अतिशय तत्परतेने आणि संयमाने कारवाई पार पाडली.

 

या घटनेची सविस्तर बातमी तीन दिवसांपूर्वी ‘पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज’ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. बातमी प्रसिद्ध होताच परिसरात पोलीस दलाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होऊ लागले असून नागरिकांतही एक सकारात्मक विश्वास निर्माण झाला आहे.

ADVERTISEMENT

 

“राजेश गवळी” यांच्या नेतृत्वात राजगड पोलिसांनी याआधीही गुटखा,अवैध दारू यांसारख्या गुन्हेगारी प्रवृत्तींवर वेळोवेळी कठोर कारवाई करत गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचे उल्लेखनीय योगदान दिले आहे.

 

या यशस्वी कार्याची दखल घेत प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुका यांनी राजगड पोलिसांचे जाहीर कौतुक केले आहे.

 

प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष अजय कांबळे यांनी म्हटले की,

“पोलीस निरीक्षक राजेश गवळी आणि त्यांची संपूर्ण टीम ही भोर तालुक्यातील नागरिकांसाठी एक विश्वासार्ह सुरक्षा कवच आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेण्यासारखी आहे. आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो.”

 

ही कामगिरी पोलिस दलाचे मनोबल उंचावणारी असून नागरिकांमध्ये विश्वास दृढ करणारी आहे. राजगड पोलीस ठाण्याची कार्यपद्धती इतर पोलीस ठाण्यांसाठी आदर्श ठरत आहे.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!