माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार उद्घाटन
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
जिल्हा परिषद, सातारा यांच्यावतीने माझी शाळा आदर्श शाळा या कार्यक्रमांतर्गंत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन समारंभ राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री ठाणे व सातारा जिल्हा शंभूराज देसाई, यांच्या हस्ते सोमवार दि.२ सप्टेंबर २०२४ रोजी स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात जिल्हा परिषद, सातारा येथे संपन्न होत आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
सातारा जिल्ह्यातील २२३ केंद्रशाळांतर्गत प्रत्येकी एक प्रमाणे २२३ शाळांची निवड माझी शाळा आदर्श शाळा या कार्यक्रमांतर्गत केली असून सदर शाळांच्या गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य व मुख्याध्यापक उपस्थित राहणार आहेत . या सर्वांना शाळा आदर्श करणेकामी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सदर कार्यशाळेचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये करण्यात येणार असून त्यामध्ये गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व शिक्षक उपस्थित राहून सदर कार्यशाळेचा लाभ घेणार आहेत.
या कार्यशाळेच्या निमित्ताने सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने शासन निर्णयावर आधारित आनंददायी अभ्यासक्रम पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत त्यांचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच आनंददायी अभ्यासक्रम या पुस्तिकेचे तसेच शैक्षणिक दिनदर्शिकेचे व शिक्षक मार्गदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सन २०२३-२४ मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर व्यवस्थापनांच्या शाळांमधील जिल्हास्तरावर प्रथम तीन क्रमांक प्राप्त शाळांचा बक्षीस वितरण समारंभ तसेच सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत सन २०२३-२४ मध्ये राबविलेले स्वच्छ सुंदर व उपक्रमशिल गुणवत्तापूर्ण शाळा अंतर्गत प्राथमिक व उच्च प्राथमिक गटातील अनुक्रमे प्रथम तीन क्रमाकांच्या शाळांचा बक्षीस व गौरव समारंभ होणार आहे.
सदर कार्यक्रमासाठी सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, उपअभियंता बांधकाम व पाणीपुरवठा, शाखा अभियंता, मनरेगा तांत्रिक अधिकारी व स्वयंरोजगार कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.
राज्यातील जिल्हा परिषदेच्या शैक्षणिक विभागात सातारा जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अग्रेसर आहे. जावली तालुक्याने महाराष्ट्रात पॅटर्न उभारला त्या सर्व अधिकारी व शिक्षकांनी त्यांचे लाभलेले योगदान महत्त्वाचे आहे. आज नवसाक्षरता अभियानात सातारा जिल्हा अग्रेसर असून देशासाठी नवसाक्षरता अभियानात सहभागी झालेल्या बबई म्हसकर यांना देशात या अभियानाचे ” आयडॉल ” म्हणुन दिल्लीच्या शिक्षण विभागातील तैलचित्र साताऱ्याच्या शैक्षणिक विभागाच्या अधिकारी करत असलेल्या कामाची पोहोच पावती असून देशभरात या साताऱ्याच्या बबई म्हसकर यांच्या चित्राच्या साक्षीने आज नव साक्षरता अभियानास चालना मिळत आहे
कविता मोहनराव जगताप, माजी जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य



