वागजवाडीमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप — शिवप्रहार प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना पाट्या व दप्तरांचे वाटप
मंगेश पवार
दि. 15 ऑगस्ट सारोळे :- वागजवाडी गावातील शैक्षणिक आणि बालविकास क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. शिवप्रहार प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोहिते यांच्या हस्ते अंगणवाडी वर्गातील मुलांना पाट्या आणि पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले
या उपक्रमात गावातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, अंगणवाडी कर्मचारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.
जि. प. प्राथमिक शाळा सिद्धेश्वरनगर (वागजवाडी) — मुख्याध्यापक विद्या महादेव पापळ, उपशिक्षिका सुनंदा शिवाजी काकडे
जि. प. प्राथमिक शाळा वागजवाडी — मुख्याध्यापक ज्योती मच्छिंद्र कदम, उपशिक्षिका दिपाली भारत आयवळे
जि. प. प्राथमिक शाळा राऊतवाडी — मुख्याध्यापक अरुणा भरत शितोळे
अंगणवाडी सिद्धेश्वरनगर — सेविका मंजुषा शिवाजी आवाळे, मदतनीस भाग्यश्री प्रमोद राऊत
सरपंच — माननीय निकिता ज्ञानेश्वर आवाळे
उपसरपंच — समिर मारुती आवाळे
सदस्य व सर्व ग्रामस्थ वागजवाडी
या कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात आले असून, पाट्या व दप्तरांचे वाटपामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी अधिक उत्साह निर्माण झाला. ग्रामस्थांनी संतोषजी मोहिते यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि अशा सामाजिक कार्यात पुढेही सहभागी होण्याचे आवाहन केले.


