भोर तालुक्यातील गुणवंतांचा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात गौरव; इंडियन आर्मी, वायुसेना व स्पर्धा परीक्षांतील यशाचे अभिनंदन


मंगेश पवार

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व श्री स्वामी समर्थ सेवेकरी व्हाट्सअप ग्रुप यांच्या वतीने भोर तालुक्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्याची परंपरा सातत्याने जपली जाते. याच उपक्रमांतर्गत आज भोर शहरातील वेताळपेठ येथील सुयोग भरत बांदल यांनी Indian Army व भारतीय वायुसेना या दोन्ही दलांमध्ये यश संपादन केल्याबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे त्यांचा सन्मान करून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या.

 

यावेळी विविध परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या इतर गुणवंत विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला.

ADVERTISEMENT

इम्रान इद्रिसी (संजय नगर, भोर), संदेश लांडे (तळे म्हसवली), सौरभ पारठे (आपटी) आणि ओंकार वाटकर (गोळेवाडी, म्हसर) यांनी Indian Army मध्ये यश संपादन केले.

हृषीकेश मादगुडे (भावेखल) यांनी भारतीय वायुसेना मध्ये यश मिळवले.

गोकवडी गावचे हृषीकेश सुधाकर बांदल यांनी पीएसआय पदावर निवड मिळवली, तर प्रणिकेत सुदाम ओंबळे यांनी सनदी लेखापाल (CA) परीक्षेत यश संपादन केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे स्वामींची आरती करण्यात आली व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याबाबत माहिती स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!