छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत :- सातारा खंडाळा तालुक्यांतील जवान अमर शामराव पवार शहीद, कुटुंबावर शोककळा.


 

संभाजी पुरीगोसावी ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी

सध्या महाराष्ट्रांत विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत यादरम्यान साताऱ्याहून एक दुःखद बातमी समोर आली आहे. छत्तीसगडमध्ये माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहेत तर 2 जवान जखमी गंभीर झाले आहेत. शहीद जवानांमध्ये साताऱ्यातील खंडाळा तालुक्यांतील एका सुपुत्राचा समावेश आहे. वीर जवान अमर पवार अमर रहे ! अमर शामराव पवार (वय ३६) असे या शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. शहीद जवान अमर पवार हे मूळचे साताऱ्यातील खंडाळा तालुक्यांतील बावडा येथील रहिवासी आहेत. अमर पवार यांना वीरमरण याची माहिती गावात पसरताच शोककळा पसरली आहे. जवान अमर शामराव पवार हे सन 2010 मध्ये भारतीय सैन्य दलात भरती झाले होते. ते आयटीबीपी 53 बटालियनचे जवान होते. अमर पवार यांचे प्राथमिक शिक्षण बावडा येथे झाली त्यांचा मोठा मित्रपरिवार बावडा येथे आहे. गावातील सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांचा मोठा सहभाग होता. सर्वांचे ते लाडके होते. त्यांच्या निधनाने बावडासह संपूर्ण परिसरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर खंडाळा तालुका देखील हेलावून गेला आहे. त्यांच्या पश्चांत आई वडील पत्नी सात वर्षाचा मुलगा भाऊ भाऊजी असा परिवार आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!