शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ३८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुंबई येथे अभिवादन कार्यक्रम संपन्न! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिवादन


दिलीप वाघमारे

 

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार, शिक्षण व उद्योग समूहाचे शिल्पकार स्व. शिवाजीराव (आबासाहेब) देसाई यांच्या ३८ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाईच्या मुंबईतील पावनगड निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य व राजकीय-सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांकडून स्व. शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

 

महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे सुपुत्र आणि लोकनेते बाळासाहेब देसाई सहकार, शिक्षण व उद्योग समूहाच्या माध्यमातून पाटण तालुक्याला विकासाची विधायक दिशा दाखविणारे स्व. शिवाजीराव देसाई यांच्या ३८ व्या पुण्यतिथीनिमित्त उत्पादन शुल्क मंत्री मा. ना. शंभूराज देसाई यांच्या मुंबईतील पावनगड निवासस्थानी शुक्रवारी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी स्व. शिवाजीराव देसाई यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेब म्हणाले की, “स्व. शिवाजीराव देसाई अर्थात स्व. आबासाहेबांनी लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचा जनसेवेचा वारसा आमच्याकडे सुपुर्द केला आहे. तसेच त्यांच्या प्रेरणेने पाटण तालुक्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

 

या अभिवादन कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी उपस्थित राहून स्व. आबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, विधानसभा अध्यक्ष मा. राहुलजी नार्वेकर, महसूल मंत्री मा. राधाकृष्णजी विखे-पाटील, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखरजी बावनकुळे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष मा. हर्षवर्धनजी पाटील, मृद व जलसंधारण मंत्री मा. संजयजी राठोड, उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह सहकार, शिक्षण, प्रशासन, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी उपस्थित राहून स्व. शिवाजीराव देसाई यांच्या स्मृतींना अभिवादन केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!