मरीआई घाटात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून खळबळ
दि.14 कासुर्डी :-राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिवापुर – सासवड रोडवरील मरीआई घाटाच्या तिसऱ्या वळणावर,एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
सदर प्रकाराबाबत पोलीस पाटील नरेंद्र देवराम गायकवाड (वय 41, रा. कासुर्डी खे. बा.) यांनी पोलीसांना खबर दिली. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, वय अंदाजे 30 ते 35 वर्षांच्या एका अनोळखी पुरूषाचा मृतदेह,दि.14 जून 2025 रोजी सकाळी 7:00 वाजण्याच्या आत, सिमेंटच्या कठड्याखाली आढळून आला. नेमका मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची नोंद राजगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाने या अनोळखी मृत व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास राजगड पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
या प्रकरणाचा तपास राजगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनासाठी दाखल अंमलदार नाना मदने यांनी केले असून तपास अधिकारी म्हणून पो.स.ई. पाटील करीत आहेत.


