बोंडारवाडी धरण लवकरात लवकर बांधून त्यास विजय सागर हे नाव दिले जाईल हीच खरी श्रद्धांजली होईल – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

माझ्या आत्तापर्यंतच्या लढ्यात सर्वात महत्त्वाचा लढा हा असेल कारण माझ्या धाकट्या भावाप्रमाणे मी विजयराव मोकाशी यांच्याकडे पाहत होतो – डॉ.भारत पाटणकर

केळघर : जावळी तालुक्याचे जलनायक कै विजयराव मोकाशी साहेब यांची द्वितीय पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन दि २० सप्टेबर २०२४ रोजी स्वामी समर्थ मंगल कार्यालयात संपन्न झाला त्यावेळी काळेश्वरी भजन मंडळ वरोशी , केडंबे , भजन मंडळ डांगरेघर , तळोशी , मालचौडी श्री केदारेश्वर भजन मंडळ मामुर्डी, भजन सम्राट शंकरराव पवार, यांना साथ ह भ प भरत जाधव भणंग , सुनिल आण्णा धनावडे , एकनाथ ओंबळे , बजरंग चौधरी , तबला पटू ओम भिलारे ,प्रशांत कांबळे केडंबे उपस्थित होते शंकरराव पवार यांनी साहेबांच्या जीवनावर गित व पोवाडे गाऊन मंत्रमुग्ध केले सुस्वर भजन कार्यक्रम व पसायदान झालेवर फुलाचा बोंडारवाडी धरण कृती समीती व ५४ गावच्या शेतकऱ्यांच्या उपस्थिती मधे संपन्न झाला .
या कार्यक्रमा साठी सातारा जावळी विधानसभेचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले , डॉ . भारत पाटणकर श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष , माजी आमदार सदाभाऊ सपकाळ , माजी सभापती बापुराव पार्टे ,मा सहाय्यक पोलीस उपायुक्त राजेंद्र मोकाशी साहेब , एस एस पार्टे गुरुजी उद्योजक, माजी अर्थ व शिक्षण सभापती अमित कदम , आनंदराव सपकाळ मा संचालक जावली बॅक , एकनाथ ओंबळे ,राजेंद्र धनावडे शेठ ‘ अदिनाथ ओंबळे , नारायण सुर्वे ‘ वैभव ओंबळे , नारायण धनावडे पुणे ,उषा उंबरकर , सुद्या चिकणे , कविता ओंबळे ,विद्या सुर्वे , नंदा जाधव , दिपक मोरे , गेणूबुवा दुंदळे , महादेव जाधव , विश्वनाथ धनावडे , रामभाऊ शेलार
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला .
बोंडारवाडी धरण जावळी तालुक्याचे दृष्टीने महत्वाचे आहे धरणामुळे या ५४ गावचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल धरणाचे श्रेय हे निर्विवाद आदरणीय मोकाशी साहेबांनाच जाते बोंडारवाडी धरण लवकरात लवकर बांधून त्यास विजयसागर हे नाव दिले जाईल हिच खरी श्रध्दांजली होईल असे मत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडले
डॉ भारत पाटणकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मोकाशी साहेबांना श्रध्दांजली वाहताना सांगितले माझ्या आत्तापर्यंत च्या लढ्यात सर्वांत महत्वाचा लढा हा असेल कारण माझ्या धाकट्या भावाप्रमाणे मी विजयराव मोकाशी यांचे कडे पहात होतो . सामान्य शेतकरी संघटीत करून कार्यकर्त्यांची फळी उभी करून या धरणाच्या लढयात विजयराव केंद्रस्थानी होते . आज ते असते तर अजुन तिव्र लढा झाला असता आपण सर्वांनी एकत्र येवून धरण पुर्ण करूया व ज्यांचे पुर्नवसन होणार आहे त्या शेतकऱ्यांचे योग्य पुर्नवसन झाल्या शिवाय बोंडारवाडी धरणाची घळभरणी होणार नाही व शेवटचा खातेदाराचे योग्य पुर्नवसन होईपर्यंत मी कार्यरत राहीन . आपण सर्व मतभेद बाजुला ठेवून धरण पुर्ण करूया हिच खरी श्रध्दांजली असेल
मा सदाभाऊ सपकाळ यांनी विजयराव मोकाशी साहेब हे दुर द्रष्टी असणारे सामान्य जनतेचे नेते होते त्यांच्या जाण्याने जावळीच्या जनतेची मोठी हानी झालीय हि पोकळी कधीच भरून येणार नाही त्यांनी पाहिलेले बोंडारवाडी धरण हे स्वप्न पुर्ण करून शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहचेल हिच खरी श्रध्दांजली ठरेल .
मा सहाय्यक पोलीस उपआयुक्त श्री राजेंद्र मोकाशी साहेबांनी उपस्थित सर्वांचे मोकाशी कुटुंबीयांचे वतीने आभार मानले व बोंडारवाडी धरण हे आमदार शिवेंद्रसिहराजे यांनी मनात आणले तरच होईल त्यांचे राज्यसरकार मध्ये मोठे वजन आहे मी त्यांना विनंती करतो कि आपण लवकरात लवकर धरण पूर्ण करावे .
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना आदिनाथ ओंबळे निमंत्रक बोंडारवाडी धरण कृती समिती यांनी करत असताना बोंडारवाडी धरण हे अंतीम टप्प्यात आले आहे . कै. विजयराव मोकाशी साहेबांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण सर्व कार्यकर्त्यांनी संघटीत राहुन हा लढा अजुन तिव्र करण्याची गरज भासली तर तो आपण करू आपल्या सर्वांची साथ हवी आहे असे प्रस्तावीत करून साहेबांना श्रध्दांजली वाहिली .
५४ गावातील आजी माजी सरपंच , उपसरपंच , पदाधिकारी ,महिला मंडळ उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता जगन्नाथ जाधव , सुरेश कासुर्डे , श्रीरंग बैलकर , राजेंद्र जाधव , बंडू पार्टे , जनार्दन मोरे , विलास शिर्के , अंकुश कासुर्डे मेहनत घेतली .
सुत्र संचालन एकनाथ सपकाळ यांनी केले तर आभार
श्रीरंग बैलकर यांनी मानले .

ADVERTISEMENT

*बोंडारवाडी धरण लवकरात लवकर बांधून त्यास विजय सागर हे नाव दिले जाईल हीच खरी श्रद्धांजली होईल – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!