संजय शेलार खून प्रकरणातील अखेर आरोपी गजाआड हत्या करणारा व त्यास सहकार्य करणाऱ्या सह पाच आरोपींना अटक मेढा, वाई पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,
उपसंपादक: संभाजी पुरीगोसावी
जिल्ह्यासह महाराष्ट्रांत चर्चिल्या गेलेल्या संजय गणपत शेलार खून प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांना अखेर जरेबंद केले आहे, त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आली आहे, जावली तालुक्यांतील अंधारी येथे (दि. 2 जानेवारी) रोजी संजय गणपत शेलार यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांने (एलसीबी) कण्हेरधरणा शेजारी असणाऱ्या हॉटेल जलसागर चा मालक अरुण बाजीराव कापसे (वय 55) रा. मळ्याची वाडी ता.सातारा) याला बुधवारी पुन्हा मिरजमधून मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, दरम्यान आत्तापर्यंत संजय शेलार खून प्रकरणात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे, यामध्ये अरुण बाजीराव कापसे (रा.मळ्याची वाडी ता.जि. सातारा) रामचंद्र तुकाराम दुबळे (रा. मतकर कॉलनी शाहूपुरी सातारा) विकास अवधूत सावंत (रा. मोळाचा ओढा सातारा) अजिंक्य विजय गवळी (रा. शनिवार पेठ मिरज ता. जि. सांगली) प्रशांत मधुकर शिंत्रे (रा. बेळकी ता. मिरज जि.सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या पाच संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून (दि. 2) जानेवारी मेढा पोलीस स्टेशन हद्दीत संजय गणपत शेलार रा. अंधारी ता. जावली जि.सातारा) यांचा मृतदेह आढळून आला होता यानंतर (दि.15) जानेवारी रोजी मयताची पत्नी हिने मेढा पोलीस ठाणेत या संदर्भात गुन्हा दाखल केला होता, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांतील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे स.पो.नि. अश्विनी पाटील स.पो.नि. अमोल गवळी पोलीस उपनिरीक्षक पांगारे शिंगाडे सुधीर वाळुंज तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथक, मेढा,वाई पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार यांनी सहभाग घेतला होता, सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करीत आहेत.