फलटण येथे आढळाला महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह
प्रतिनिधी: शंकर माने : 26 जानेवारी: सातारा जिल्ह्यातील फलटण येथे बेवारस महिलेचा अर्धवट अवस्थेतील मृतदेह आढळल्याची गंभीर घटना घडली. विडणी ता फलटण जि सातारा येथील पोलीस पाटील यांनी या घटनेची खबर दिली आहे. दि 17 जानेवारी रोजी सकाळी 10.25 च्या सुमारास त्यांना विडणी गावाच्या हद्दीतील प्रदीप महादेव जाधव यांच्या पंचवीसफाटा नावाच्या शिवारात असणाऱ्या उसाच्या शेतात मानवी मृतदेहाचा पायाकडील भाग मिळाल्याचे सांगितले.त्यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री करून पोलीस पाटील सौ.शीतल धनाजी नेरकर रा.विडणी, ता फलटण जि. सातारा यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये खबर दिली.महिलेचा मृतदेह अर्धवट अवस्थेत असल्याने अजून ओळख पटली नाही. यामध्ये मृतदेहाचा कमरेखालील भाग त्यामध्ये दोन्ही पायांच्या मांडी, गुडघा व नडगीचा भाग आहे. कंबरे वरील भाग व पायाचे पंजे नाहीत. तसेच त्यालगत मानवी कवटीचा भाग मिळाला आहे. मृतदेह मिळालेल्या ठिकाणापासून 30 मी अंतरावर तेलकट द्रवामध्ये भिजलेली साडी आढळली आहे.सदर अकस्मात मयतेचा तपास फिर्यादी यांनी करून तपासाअंती निष्पन्न परिस्थितीवरून त्यांनी दिलेल्या जबाब वरून गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अज्ञात आहे.
यावरून भारतीय सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 194 अन्वये अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे. याबाबतचा तपास पोलिस उप निरीक्षक मच्छिन्द्रनाथ पाटील यांनी करून अकस्मात मयत घोषित केले आहे.