लोणंद रोटरी तर्फे 1200 विद्यार्थिनीची हिमोग्लोबिन तपासणी संपन्न.
उपसंपादक: दिलीप वाघमारे
रोटरी क्लब लोणंद आयोजित “”अनेमिया बाय-बाय””” हा प्रोजेक्ट नुकताच न्यू इंग्लिश स्कूल मुलींचे लोणंद येथे राबविण्यात आला. सुमारे 10 दिवस चाललेल्या या कार्यक्रमात 1200 विद्यार्थिनींची रक्तामधील हिमोग्लोबिनची तपासणी,व सि बी सि. तपासणी धन्वंतरी डायग्नोस्टिक सेंटर लोणंद, व राजमुद्रा लॅब लोणंद यांच्या वतीने मोफत करण्यात आली. सर्व मुलींची आरोग्य तपासणी डॉक्टर अनिल राजे निंबाळकर. व डॉक्टर किशोर बुटीयानी योग्य ते मार्गदर्शन व उपचार केले. रक्तामधील हिमोग्लोबिन लेवल कमी असलेल्या मुलींसाठी रक्त वाढीची औषधे रोटरी क्लब लोणंद तर्फे मोफत देण्यात आली. आहारतज्ञ सौ प्राची कुलकर्णी यांनी आहाराबाबत पालकांना व मुलींना सखोल मार्गदर्शन केले.3T म्हणजे टेस्ट, ट्रीटमेंट आणि टॉक अशाप्रकारे हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचे रोटरीचे अध्यक्ष रो. प्रवीण चांदवडकर यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रोटरीचे अध्यक्ष रो प्रवीण चांदवडकर रो सचिव गोपाल खंडारे खजिनदार रो भरत गांधी. सातारा जिल्हा रोटरी कॉप्स अध्यक्ष विजयकुमार देशमुख डॉक्टर अनिल राजे निंबाळकर, डॉक्टर किशोर बुटीयानी डॉक्टर दयाराम सूर्यवंशी. प्राजीत परदेशी.शाळेच्या प्राचार्य सौ सुनंदा नेवसे व सर्व शिक्षक. धन्वंतरी डायनास्टिक लॅबचे खरात व सर्व टीम. राजमुद्रा लॅब चे उदय शिंदे व सर्व टीम यांनी कठोर परिश्रम घेतले.


