कामथडी येथून मोबाईल आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लंपास केली.
नसरापूर प्रतिनिधी : पुणे सातारा महामार्ग लगत कामथडी येथे मोबाईल आणि रोख रक्कम चोरीस गेली आहे. याबाबत सुरेश राजमन यादव यांनी राजगड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि.७/४/२४ रोजी १० चे दरम्यान कामथडी ता. भोर जि. पुणे गावच्या हद्दीत पत्राशेड भंगारच्या दुकानात सुरेश राजमन यादव वय ४१ वर्ष सध्या रा. रामदेव बाबा मार्बलच्या शेजारी कामथडी फाटा हे आणि त्यांचे चुलते झोपले असता अज्ञात चोरट्याने नोकिया कंपनीचा आणि नारझो कंपनीचा असे मिळून २ मोबाईल आणि १२००० रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरी करून नेले आहे. म्हणून यादव यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कोंढाळकर करीत आहेत.


