जागतिक टपाल दिनानिमित्त नांदगाव, वडगाव, ऊत्रोली येथे मुलांना माहिती होण्यासाठी पोस्ट कार्ड लेखन करून भोर पोस्ट ऑफिसला दिल्या.  


 

दि. ९ भोर : आज जागतिक टपाल दिन आहे.परंतु आजची पिढी टपाल या संपर्क माध्यमापासून कोसो मैल दूर गेली आहे.पूर्वी पोस्टकार्ड,आंतर्देशीय पत्र,पाकिटं यांतून परस्परांमध्ये पत्रव्यवहार होत असे.

खूशाली कळविण्यासाठी साधे पोस्टकार्ड,काहिशी गोपनिय माहिती असेल तर आंतर्देशीय पत्र तर काही महत्वाची कागदपत्रे किंवा दिवाळीची भेटकार्डे,तिळगूळ,राखी पाठविण्यासाठी पाकिटे सर्रास वापरली जात असत.

तसेच काही अति महत्वाची म्हणजे न्यायालयीन नोटीसा,विशेषतः सदर पत्र संबंधित व्यक्तीच्याच हातात पडले पाहिजे व त्यासंबंधीचा पूरावा म्हणून पोहोच मिळाली पाहिजे यासाठी रजिस्टर पत्र, पोहोच पावती या माध्यमाचा सर्रास वापर केला जायचा.

 

संगणक,मोबाईलच्या जमान्यातील पिढीला या यंत्रणेबद्दल काहीच वाटणार नाही.पण या अनुभवातून गेलेल्या मागील पिढीच्या मनात मात्र पोस्टखात्याच्या या सुविधांशी असलेले नाते कधीच पूसले जाणार नाही…

ADVERTISEMENT

 

आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव, वडगाव, ऊत्रोली येथे मुलांना याची माहिती व्हावी म्हणून आज पत्र पोस्ट कार्ड लेखन करून टपाल दिनाच्या शुभेच्छा भोर पोस्ट आॉफिस ला देण्यात आल्या.

 

सदर उपक्रमाचे शिक्षकांनी कौतुक करून श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र चे स्वामी सेवेकरी संतोष कदम यांना या उपक्रम राबविले बद्दल शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी नांदगाव मुख्याध्यापक रमेश शेटे , वडगाव मुख्याध्यापक सो सुनिता दळवी, ऊत्रौली मुख्याध्यापक सौ सविता चोरगे ,शिक्षक दिलीप मेमाणे,

श्रीधर गव्हाणे , कैलास जाधव ,स्वाती महांगरे,सदिच्छा शिर्के , ढावरे योजना ,डेरे ज्योत्सना,उभे विमल , भंडारे विनायक, अष्टेकर भक्ती, विठ्ठल दानवले, अमर उभे ,अनिता कानडे लौखंडे

अतुल गाढवे व विद्यार्थी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!