दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेचा दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बॉक्स असोसिएशन कडून सन्मानपूर्वक गौरविण्यात आले
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मुंबई : दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लिने त्यांच्या सभासद बँकांकरीता सन २०२३/२०२४ सालाकरिता अहवाल व कामकाज स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत १००१ ते ५००० कोटी व्यवसाय असणाऱ्या बँकांच्या गटात दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँकेला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
याचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच मुंबई येथे पार पडला.
दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनने आपल्या सभासद बँकाकरिता सन २०२३-२०२४ अहवाल व कामकाज संदर्भात स्पर्धा आयोजित केलेली होती. सदर आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी सभासद बँकांचे व्यवसायावरून वेगवेगळे गट केले होते. १००१ ते ५००० कोटी पर्यंत व्यवसाय असणाऱ्या बँकांच्या गटात दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक विजेती ठरली आहे.
दत्तात्रय महाराज कळंबे जावळी सहकारी बँक १००१ ते ५००० कोटी पर्यंत व्यवसाय असणाऱ्या बँकांच्या गटात प्रथम क्रमांकाने विजयी झाली. कुर्ला मुंबई येथील बंटारा भवन येथे असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा पुरस्कार जावळी बँकेला प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांचे हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी जावली बँकेचे अध्यक्ष विक्रमजी भिलारे , उपाध्यक्ष चंद्रकांत दळवी , संचालक संतोष कळंबे ,अजित कळंबे , विश्वनाथ धनवडे ,वसंत तरडे , विजय दगडू कदम ,रामचंद्र चिकणे , व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सरव्यवस्थापक गोविंद जाधव उप सरव्यवस्थापक अनिल सणस , नामदेव बांदल व इतर उपस्थित होते .
हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना अध्यक्ष विक्रम भिलारे म्हणाले आमचे वरिष्ठ मार्गदर्शक तसेच संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रकांत गावडे , प्रकाश मस्कर , योगेश गोळेयांच्याबरोबरच आमचे सर्व आजी-माजी संचालक आणि सर्व कर्मचारी विशेष करून सर्व सभासद यांच्या सहकार्याने हा टप्पा गाठला आहेसंचालक आणि सर्व कर्मचारी विशेष करून सर्व सभासद यांच्या सहकार्याने आपण हा टप्पा गाटला आहे हा पुरस्कार सर्वांच्या मोलाच्या साथीने मिळाला आहेयापुढे सर्वांनी अशीच साथ दिल्यास कळंबे महाराजांच्या विचारांची पाठराखण करीत बँकेला भरभराटी मिळवू असे प्रतिपादन केले


