पुण्याची ओळख काय? कोयता गॅंग शरद पवारांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल, आमदार टिंगरेंवरही केली टीका,


 

संभाजी पुरीगोसावी (पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

 

महायुती सरकारमुळे सध्या राज्यांत पुणे शहरांची विद्येचे माहेरघर ही ओळख पुसली जाऊ लागली आहे. असून अंमली पदार्थाचे केंद्र अशी ओळख होऊ लागली आहे. अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पुणे शहरांत आणि परिसरांत सध्या कोयता गँगची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे. कोयत्याने हल्ले केल्याच्या अनेक घटना शहरांत सतत घडत असतात अशातच आता शरद पवारांनी महायुती सरकारचा चांगलाच समाचार घेतला आहे. टेल्को बजाज, किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट्य आणि आजच्या राज्य कार्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले? कोयता गॅंग असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केलाय आहे. शरद पवार पुढे म्हणाले, मला माहित नाही कसल्या तरी गोळ्या असतात त्या खाल्ल्या की एकदम चंद्रावर गेल्यासारखे वाटते आणि चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुणे शहरांमध्ये व्हायला लागला आहे. आजचे राज्यकर्ते कोयता गॅंग, ड्रग्स व्यवहार असो, याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करीत आहेत. त्यामुळे पुण्याची नवी पिढी ही उध्वस्त होणार या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसत असून हा प्रकार दिवसेंदिवस चांगलाच वाढत चालला आहे. महाराष्ट्रांचा चेहरा आम्हांला बदलायचाय आता एकनाथ शिंदे साहेबांचं राज्य आहे. त्याच्या आधी देवेंद्र फडवणीस यांचे राज्य होते काय केले यांच्या राजवटीत? मी स्वतः तुम्हा लोकांच्या पाठिंब्याने चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री झालो होतो आमचे अनेक सहकारी मंत्रिमंडळामध्ये होते सत्यचा वापर राज्याचा चेहरा बदलण्यासाठीच करायचा असतो. हे आम्ही दाखवलं असेही शरद पवार यावेळी म्हणाले, ( आमदार सुनील टिंगरे यांच्यावर ही जोरदार टीका ) कल्याणीनगर पोर्श कार अपघातातील जखमींना मदत करायचा सोडून, इथला दिवटा आमदार पोलीस ठाण्यात जावुन पोलिसांवर दबाव आणत होता. त्याला दमदार आमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे, असा घणाघातही पवार यांनी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!