श्री संत सोपानदेव काका पालखी सोहळ्यात “बीव्हीजी 108 किकवी सब सेंटर”चा आरोग्य सेवेतील मोलाचा सहभाग!
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
सासवड – पंढरपूर या पवित्र वारी मार्गावर श्री संत सोपानदेव काका पालखी सोहळा दरम्यान हजारो वारकऱ्यांना निस्वार्थ सेवा देणाऱ्या बीव्हीजी 108 आरोग्य टीमचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या सेवेमध्ये बीव्हीजी 108 किकवी सब सेंटरचे इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ. मंदार सुरेश माळी, पायलट श्री दामोदर अहिरे व श्री विशाल कदम, डिस्ट्रिक्ट मॅनेजर श्री प्रियांक जावळे, एडीएम श्री सुजित पाटील, तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. संतोष आप्पा कोळपे, श्री केतन कोळपे, श्री अण्णा कोंढाळकर, श्री निलेश पांगारे, सौ. रुपाली लेकवाले, कुमारी जान्हवी सोंडकर, श्रावणी चाकवते, आणि पालखी चोपदार श्री मनोज ननवरे महाराज, श्री अमोल ननवरे युवा महाराज यांचे सहकार्य मोलाचे ठरले.
या काळात सर्दी, खोकला, ताप, पायदुखी, अंगदुखी यांसारख्या ओपीडी रुग्णांची संख्या चार ते पाच हजारांपर्यंत पोहोचली असून, हार्ट अटॅक, अॅस्थमा, डायबेटीस, अशक्तपणा, उलट्या, जुलाब यांसारख्या आपत्कालीन रुग्णांमध्ये 125 ते 150 रुग्णांना वेळेत सेवा देऊन मोठ्या रुग्णालयात पोहोचवण्यात आले.
ही सेवा समस्त वारकरी संप्रदाय, विविध दिंड्या आणि पालखी ट्रस्टच्या वतीने विशेषतः कौतुकास्पद मानली जात असून, आरोग्य विभाग आणि सामाजिक क्षेत्रातील एकत्रित प्रयत्नांचे हे यश असल्याचे स्पष्ट होते.
या अमूल्य कार्याबद्दल पुण्यभूमी न्यूज परिवारातर्फे सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!


