शेतीच्या कारणावरुन हाणामारी परस्पर विरोधात विनयभंग व मारहाणीच्या तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
वाई तालुक्यातील वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात दोन गटात शेतीच्या कारणावरुन हाणामारीची घटना दि. ६ मे रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही गटाकडून परस्पर विरोधात विनयभंग व मारहाणीच्या तक्रारी वाई पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या आहेत. एका गटातील ३१ वर्षीय महिलेने दि. ६ मे रोजी दुपारी २.४७ मिनिटांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, एक महिला व चार पुरुषांनी त्या महिलेचा पती शेतात ट्रॅक्टरने नागरट करत होता. त्यांना ती महिला नाष्टा घेवून गेल्यानंतर त्यांना पाच जण हे शेत नागरंटीच्या कारणावरुन भांडत होते. त्यावेळी पाच जणांपैकी एका महिलेने चिंचेच्या काठीने ३१ वर्षाच्या महिलेच्या पतीला मारहाण केली. इतर दोघांनी तिच्या पतीला धरले होते. ही भांडणे सोडविण्यासाठी गेली असता तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन त्यातल्या एकाने केले. तर ४९ वर्षाच्या महिलेने दि. ६ मे रोजी रात्री ९.४८ मिनिटांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विरोधक असलेल्या पुरुषाने त्या ४९ वर्षाच्या महिलेच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरट सुरु केली होती. ती नागरट त्या महिलेने थांबवताच त्या पुरुषासह तीन महिलांनी तिला व तिच्या दोन मुलांना शेतात यायचे नाही असे म्हणत मारहाण करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास वाई पोलीस करत आहेत.