खेड बुद्रुक निंबोडी शिवेवर वनप्राण्यानी मृत आढळला इतर पिसाळलेल्या प्राण्यांचा वनविभागाने शोध घ्यावा नेते पवन धायगुडे पाटील
संपादक दिलीप वाघमारे
खेड बुद्रुक निंबोडी शिवेवर पाठीमागील काही दिवसांपूर्वी ज्या वन्य प्राण्याने धुमाकूळ घातला होता जेणेकरून आठ नऊ जनांवरती प्राण घातक हल्ला करून जखमी केले होते त्या वन्यप्राणी आज रामचंद्र साहेबराव शेळके पाटील आज शेतामध्ये तणनाशक मारण्यासाठी गेले असता त्यांना मेलेल्या जनावराचा घाण वास आला त्या वासाच्या अंदाजाने त्यांनी तिथे पाहणी केली असता त्यांना तो प्राणी मूर्त अवस्थेत दिसला त्यांनी लगेच तेथील नागरिकांना पवन धायगुडे, मा. सरपंच सचिन धायगुडे, तसेच अरविंद धायगुडे, तसेच अन्य काही जणांना फोन करून याबद्दल माहिती दिली त्यानंतर त्याची कल्पना वन विभागाला सुद्धा देण्यात आली वन विभागाच्या म्हणण्यानुसार ते उद्या त्या मेलेल्या वन्य प्राण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी ते त्या उघडा मारुती जागृत देवस्थान परिसरामध्ये येणार आहेत नागरिकांना या द्वारे एकच सांगणे आहे की हा जो वन्यप्राणी आहे तो पाठीमागील ज्या लोकांच्या वर हल्ला केला होता हा तो प्राणी आहे आणि आता सध्या पाठीमागील दोन-तीन दिवसांपूर्वी काळवट मळा परिसरामध्ये महिला भगिनी खुरपडण्यासाठी गेले असता त्यांच्यावरती ज्या वन्य प्राण्यांनी हल्ला केलेला आहे तसेच बाळासाहेब येळे यांच्या शेड वर जाऊन त्यांच्या गुरांच्यावर दोन-तीन वेळा हल्ला केला पण तेथील कामवाल्या गड्याने त्याला हटवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो धावून धावून त्या गुरांच्यावर माणसांच्या वर येत होता त्यानंतर नी मानेवस्ती येथील शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या माने यांच्यावर सुद्धा शेळ्यांच्यावर त्याने हल्ला केला त्यानंतर नी असाच एक मेंढरे चालणाऱ्या व्यक्तीवर सुद्धा हल्ला करण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून एवढेच जनजागृती करण्याच्या उद्देशाने एक सांगणे आहे की अजूनही त्या वन्यप्राण्याची भीती गेलेली नाही आता सध्या मेलेल्या अवस्थेत सापडलेल्या वन्य प्राण्यांमुळे तो पिसाळलेला असल्यामुळे अजूनही कित्येक असे प्राणी आहेत की त्याच्यामुळे ह्या बाकीच्या वन्य प्राण्यांना सुद्धा त्याची लागण झालेली आहे त्यामुळे हे बाकीचे जे पिसाळलेले प्राणी आहेत त्याचा आपण अंदाज लावू शकत नाही की ते अजून किती असू शकतील त्यामुळे खेड बुद्रुक, निंबोडी शिवे वरील उडा मारुती परिसर इनाम पट्टा, मानेवस्ती ,झिरप वस्ती काळवट मळा, व्हटकर मळा येथील नागरिकांनी शेतकरी वर्गांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे तसेच सतर्क राहून स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे.


